VIDEO : हृतिक रोशन एका मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, हातात हात घेऊन दिसल्यामुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 02:12 PM2022-01-29T14:12:14+5:302022-01-29T14:14:18+5:30

Hrithik Roshan with mystery girl : हृतिक रोशन नुकताच मुंबईतील एका जपानी रेस्टॉरन्टमध्ये डिनरला गेलेला दिसला. यावेळी त्याला एका मिस्ट्री गर्लसोबत (mystery girl) बघण्यात आलं.

Hrithik Roshan spotted on dinner date with mystery girl watch video | VIDEO : हृतिक रोशन एका मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, हातात हात घेऊन दिसल्यामुळे चर्चेला उधाण

VIDEO : हृतिक रोशन एका मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, हातात हात घेऊन दिसल्यामुळे चर्चेला उधाण

googlenewsNext

हृतिक रोशन (Hrithik Roshan) बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. बराच काळ झाला हृतिकचा कोणता सिनेमा आला नाही. त्यामुळे फॅन्स त्याच्या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहे. तो नुकताच मुंबईतील एका जपानी रेस्टॉरन्टमध्ये डिनरला गेलेला दिसला. यावेळी त्याला एका मिस्ट्री गर्लसोबत (mystery girl) बघण्यात आलं. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, ही मिस्ट्री गर्ल कोण आहे?

हृतिक रोशनने रेस्टॉरन्टमधून बाहेर येताना या मिस्ट्री गर्लचा हात धरला आणि तिला आपल्या लक्झरी गाडी बसवलं. त्यानंतर दोघेही निघून गेले. हृतिकचे या मिस्ट्री गर्लसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि फॅन्सच्या मनात मिस्ट्री गर्लबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

पापाराजी हृतिकला थांबून पोज देण्यासाठी सांगत होते. पण तो थांबला नाही. इतकंच नाही तर हृतिक या मिस्ट्री गर्लला कॅमेरापासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसला आणि तिच्यासोबत गाडीत बसला. आता दोघांचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक या मिस्ट्री गर्लबाबत चर्चा करू लागल आहेत. लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की, ही मिस्ट्री गर्ल कोण आहे?

ही मिस्ट्री गर्ल कोण आहे? हे कुणालाच माहीत नाही. पण फॅन्स अंदाज लावत आहे की, ही तरूणी सबा आझाद आहे. ती एक युवा संगीतकार आहे. तिने काही दिवसांपूर्वीच नसीरूद्दीन शाहचा मुलगा इमादसोबत काम केलं. पण हे काही कन्फर्म नाही.

हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर तो लवकरच अॅक्शन सिनेमा 'विक्रम वेधा' मध्ये दिसणार आहे. हा तमिळ सिनेमाचा रिमेक आहे. यातील हृतिकचा लूक काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यात सैफ अली खान आणि राधिका आपटे दिसणार आहे. तसेच तो दीपिका पादुकोनसोबत 'फायटर' सिनेमातही दिसणार आहे.
 

Web Title: Hrithik Roshan spotted on dinner date with mystery girl watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.