होणाऱ्या सासूबाईंच्या बर्थ डे पार्टीत साडी नसून पोहोचली ह्रतिक रोशनचा गर्लफ्रेंड, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 09:36 IST2023-10-23T09:33:21+5:302023-10-23T09:36:23+5:30

सबाचे रोशन कुटुंबियांसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Hrithik roshan seen girlfriend saba azad video viral | होणाऱ्या सासूबाईंच्या बर्थ डे पार्टीत साडी नसून पोहोचली ह्रतिक रोशनचा गर्लफ्रेंड, व्हिडिओ होतोय व्हायरल

होणाऱ्या सासूबाईंच्या बर्थ डे पार्टीत साडी नसून पोहोचली ह्रतिक रोशनचा गर्लफ्रेंड, व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची (Hritik Roshan) गर्लफ्रेंड सबा आजाद (Saba Azad) बद्दल ऐकलं असेलच. हृतिकची गर्लफ्रेंड अशीच तिची ओळख बनली आहे. ह्रतिक आणि सबा अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट होतात. नुकतेच झालेल्या ह्रतिक रोशनच्या आईच्या बर्थ डे पार्टीत सबाने हजेरी लावली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

ह्रतिकचा सुझान खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात सबा आझादची एंट्री झाली. दोघे एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करतायेत. ह्रतिक आणि सबाचे रोमाँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकवेळा व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या दोघांचा चर्चेत आला आहे. 
 
अभिनेता ह्रतिक रोशनची आई पिंक रोशनचा यांचा नुकताच वाढदिवस झाला. यानिमित्त संपूर्ण रोशन परिवारने एकत्र येईन सेलिब्रेशन केलं. यावेळी ह्रतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत दिसला. सबाने चक्क साडी नेसून होणाऱ्या सासूबाईंच्या पार्टीत एंट्री केली. रोशन कुटुंबियांसोबतचे सबाचे फोटो व्हायरल होतायेतय. पीच कलरच्या साडीत सबा सिंपल लूकमध्ये सुंदर दिसत होती. सध्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.   

 

सबा हृतिक रोशनपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. दोघंही एकमेकांच्या प्रेमात असून हातात हात घालून बाहेर डेटवर जाताना दिसतात. सबा नुकतीच 'हू इज युअर गायनॅक' या सिरीजमध्ये काम केले. तिचा स्वत:चा म्युझिक बँडही आहे.
 
 

Web Title: Hrithik roshan seen girlfriend saba azad video viral