हृतिक-सबाचं नेमकं चाललंय काय? अभिनेत्याच्या फॅमिली लंचसोबतचे फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 15:10 IST2022-02-21T15:09:42+5:302022-02-21T15:10:42+5:30
Hrithik roshan: सध्या सोशल मीडियावर अभिनेता हृतिक रोशन आणि त्याच्या मिस्ट्री गर्लची म्हणजेच सबा आझाद यांची जोरदार चर्चा रंगली आहे.

हृतिक-सबाचं नेमकं चाललंय काय? अभिनेत्याच्या फॅमिली लंचसोबतचे फोटो व्हायरल
बॉलिवूडमधील कलाकारांच्या पर्सनल लाइफमधील अनेक गोष्टी नेटकऱ्यांमध्ये सातत्याने चर्चेत असतात. यात त्यांचं अफेअर, ब्रेकअप, घटस्फोट यांची तर कायमच चर्चा होत असते. सध्या सोशल मीडियावर अभिनेता हृतिक रोशन आणि त्याच्या मिस्ट्री गर्लची म्हणजेच सबा आझाद यांची जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामध्येच आता सबाने हृतिकच्या कुटुंबासोबत फॅमिली लंच केल्यामुळे ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे.
काही दिवसांपूर्वी सबा आणि हृतिक या दोघांना मुंबईतील एका रेस्टरंटबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु आहे. त्यामध्येच आता सबा हृतिकच्या घरी लंचसाठी गेल्यामुळे या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
हृतिकचे काका राजेश रोशन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रोशन फॅमिली दिसत असून त्यांच्यासोबत सबादेखील दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी “आनंद हा आपल्या आजूबाजूला असतो. विशेषत: जेव्हा रविवारी जेवणाची वेळ असते”, असं कॅप्शन दिलं आहे.
हृतिकसोबत असलेली मिस्ट्री गर्ल खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; पाहा Saba Azad चे हॉट फोटो
दरम्यान, राजेश रोशन यांच्या या पोस्टवर सबा आणि हृतिक या दोघांनीही कमेंट केली आहे. सबा कलाविश्वात सक्रीय असून ती अभिनेत्री असण्यासोबतच एक म्युझिशिअनदेखील आहे. तसंच ती उत्तम नृत्यांगना आहे. ती ओडिसी, क्लासिकल बॅले, जॅझ आणि कंटेम्पररी डान्स यांमध्येही पारंगत आहे.