Shocking! राकेश रोशन यांनाही कॅन्सर, हृतिक रोशनने खुद्द केला खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 10:45 IST2019-01-08T10:44:11+5:302019-01-08T10:45:33+5:30

बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. होय, बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता इरफान खान,आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप आणि ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली यांच्या पाठोपाठ अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनाही कॅन्सरने ग्रासले आहे.

Hrithik Roshan reveals father Rakesh Roshan has been diagnosed with cancer | Shocking! राकेश रोशन यांनाही कॅन्सर, हृतिक रोशनने खुद्द केला खुलासा!!

Shocking! राकेश रोशन यांनाही कॅन्सर, हृतिक रोशनने खुद्द केला खुलासा!!

बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. होय, बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता इरफान खान,आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप आणि ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली यांच्या पाठोपाठ अभिनेते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनाही कॅन्सरने ग्रासले आहे. होय, काही तासांपूर्वी खुद्द हृतिक रोशन याने याबाबतचा खुलासा केला.  
हृतिकनने डॅड राकेश रोशन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत, याबाबतची माहिती दिली. ‘मी आज सकाळी पापाला फोटोसाठी विचारले. त्यांनी आज सर्जरीच्या दिवशीही जिम मिस केले नाही. मी ज्यांना ओळखतो, त्यात ते सर्वाधिक खंबीर व्यक्तिमत्त्व आहेत. काही आठवड्यांपूर्वी त्यांना गळ्यात squamous cell carcinomaचे (कॅन्सरचा प्राथमिक टप्पा )निदान झाले. पण आजही ते कमालीचे ऊर्जाशील आहेत आणि भावी लढाईसाठी सज्ज आहेत. आम्हा कुटुंबाला इतके खंबीर नेतृत्व मिळाले, याबद्दल आम्ही नशीबवान आहोत. खूप सारे प्र्रेम, डॅड’, असे हृतिकने लिहिले आहे.


हृतिक रोशनच्या या पोस्टनंतर राकेश रोशन यांचे तमाम चाहते त्यांच्या लवकर बरे होण्याची कामना करत आहे. अनेक युजर्सनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.
 १९७० मध्ये  घर घर की कहानी  या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरचा श्रीगणेशा केला. खून भरी मांग, खेल खेल में, खट्टा मीठा, खुबसूरत यांसह जवळपास ४० सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला.  त्यानंतर खुदगर्ज  या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात एन्ट्री घेतली.


  काला बाजार,  किशन कन्हैया , करण अर्जुन , कहो ना प्यार है, कोई मिल गया ,  क्रिश  या सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन केले. मुलगा हृतिकला त्यांनी  कहो ना प्यार है  या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले. या सिनेमाने हृतिकला एका रात्रीत सुपरस्टार बनवले. तसे पाहता, हृतिकने आपल्या वडिलांपेक्षा जास्त लोकप्रियता प्राप्त केली आहे. बॉलिवूडच्या सुपरस्टार्सच्या यादीत हृतिकची गणती होते. हृतिक त्याची पत्नी सुझान खानपासून कायदेशीररित्या कायमचा विभक्त झाला आहे.

Web Title: Hrithik Roshan reveals father Rakesh Roshan has been diagnosed with cancer