हृतिकने गर्लफ्रेंड सबाला जुहूतील आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्याने, दरमहा घेणार 'इतकी' रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:58 IST2025-10-09T09:57:34+5:302025-10-09T09:58:44+5:30
हृतिक रोशनने सी-फेसिंग आलिशान घर सबा आझादला भाड्याने दिले आहे.

हृतिकने गर्लफ्रेंड सबाला जुहूतील आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्याने, दरमहा घेणार 'इतकी' रक्कम
Hrithik Roshan Rents Out A Luxurious Apartment: हृतिक रोशन याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सबा आझाद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद लग्न करणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. त्यांनी २०२२ मध्ये करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. आता हृतिकने सबासाठी एक खास गोष्ट केली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे. हृतिकने जुहू येथील आपले आलिशान अपार्टमेंट सबाला भाड्याने दिले आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सी-फेसिंग महागड्या प्रॉपर्टीसाठी हृतिकने त्याची गर्लफ्रेंड सबा आझादला भाडे म्हणून केवळ ७५,००० रुपये प्रति महिना आकारले आहे. एका वर्षासाठी या भाड्याची एकूण रक्कम ९ लाख रुपये इतकी होते. जुहू-वर्सोवा लिंक रोडवर असलेल्या 'मन्नत अपार्टमेंट्स'मध्ये हृतिकने २०२० मध्ये ९७.५ कोटी रुपयांना हे घर खरेदी केले होते. तब्बल १२,००० चौरस फूट क्षेत्रफळाचे हे आलिशान घर तीन मजल्यांमध्ये (१८वा, १९वा आणि २०वा मजला) पसरलेले आहे.
हृतिक आणि सबाची लव्हस्टोरी
२०२२ मध्ये हृतिक आणि सबा यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात झाली. त्यांची पहिली भेट एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली होती. हृतिक रोशन (वय ५१) आणि सबा आझाद (वय ३९) यांच्या वयात १२ वर्षांचे अंतर आहे. हृतिकचे यापूर्वी सुझैन खान हिच्याशी लग्न झाले होते. पण, २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. हृतिकला एक्स पत्नी सुझान खानबरोबर दोन मुलं आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर हृतिक रोशन अलीकडेच 'वॉर २' चित्रपटात दिसला होता, तर सबा आझाद लवकरच 'सॉन्स ऑफ पॅराडाईज' या ॲमेझॉन प्राईम सिरीजमध्ये दिसणार आहे. सबा आझाद आधी नसीरुद्दीन शाह व रत्ना पाठक यांचा मुलगा इमाद शाहबरोबर (Who is Imaad Shah) रिलेशनशिपमध्ये होती. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर २०२० मध्ये सबा व इमाद शाह यांचे ब्रेकअप झाले. पण त्यांचं ब्रेकअप नात्यातील कटुतेमुळे झालं नव्हतं. दोघांनाही नातं पुढे न्यायचं नव्हतं व करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं.