​‘सुपर30’साठी हृतिक रोशन नाही तर ‘हा’ सुपरस्टार होता मेकर्सची ‘फर्स्ट चॉईस’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 13:03 IST2017-10-17T07:33:19+5:302017-10-17T13:03:19+5:30

हृतिक रोशन गेल्या काही महिन्यांपासून कायम चर्चेत आहे.  या चर्चेचे कारण म्हणजे कंगना राणौत. होय, कंगना आणि हृतिकचा वाद ...

Hrithik Roshan is not superstar but 'Ha' was the superstar, 'First Choice' by Max! | ​‘सुपर30’साठी हृतिक रोशन नाही तर ‘हा’ सुपरस्टार होता मेकर्सची ‘फर्स्ट चॉईस’!!

​‘सुपर30’साठी हृतिक रोशन नाही तर ‘हा’ सुपरस्टार होता मेकर्सची ‘फर्स्ट चॉईस’!!

तिक रोशन गेल्या काही महिन्यांपासून कायम चर्चेत आहे.  या चर्चेचे कारण म्हणजे कंगना राणौत. होय, कंगना आणि हृतिकचा वाद आता कुणासाठीही नवा राहिलेला नाही. या वादाच्या निमित्ताने दोघांच्याही आयुष्यातील जितके काही सीक्रेट चव्हाट्यावर यायचेत ते आलेत. पण आता आम्ही या वादाबद्दल नाही तर हृतिकच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. होय, हृतिक लवकरच ‘सुपर30’ फेम आनंद कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.
अलीकडे हृतिकने हा सिनेमा साईन केला आहे. पण आता याच चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळी बातमी आली आहे. होय, विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटासाठी हृतिक म्हणे फर्स्ट चॉईस नव्हता. हृतिकआधी वेगळ्याच एका अभिनेत्याला घेऊन विकास बहल यांना हा सिनेमा करायचा होता.



होय, विकास बहल यांना या चित्रपटात बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार हवा होता. अक्षयला तसा प्रस्तावही दिला गेला होता. पण अक्षयची झोळी आधीच चित्रपटांनी फुल्ल भरलेली होती. त्यामुळे मनात असतानाही हा चित्रपट त्याला स्वीकारता येणार नव्हता. मनावर मोठ्ठा दगड ठेवून म्हणे, अक्षयने या चित्रपटासाठी नकार दिला अन् हा चित्रपट हृतिकच्या झोळीत पडला. ‘काबील’नंतर तसाही हृतिककडे एकही चित्रपट नव्हता. त्यामुळे हृतिकने हा चित्रपट लगेच स्वीकारला.
आता मेकर्सला हृतिकच्या अपोझिट कॅटरिना कैफ हवी असल्याचे ऐकिवात आहे. अद्याप कॅटरिनाने चित्रपटासाठी होकार दिलेला नाही. आता मनासारखा हिरो नाही तर नाही किमान मनासारखी हिरोईन मेकर्सला मिळो, हीच आशा करूयात.

ALSO NEWS : #BreakingNews: ​हृतिक रोशनचं बनणार ‘सुपर30’चा हिरो!

आनंद कुमार बिहारात ‘सुपर30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.   जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून  निवडक ३० विद्यार्थी निवडून हे आनंद कुमार पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्या खाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि आई मदत करतात. 

Web Title: Hrithik Roshan is not superstar but 'Ha' was the superstar, 'First Choice' by Max!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.