इतकी मोठी झाली हृतिकची दोन्ही मुलं, आता कसे दिसतात हृहान आणि हृदान? Ex पत्नीने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 10:59 IST2024-11-08T10:58:43+5:302024-11-08T10:59:53+5:30

हृतिकची Ex पत्नी सुजैन खानने पहिल्यांदाच दोन्ही लेकांबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

hrithik roshan ex wife sussaine khan shared 2 childrens hrihaan and hridaan photo netizens reacted | इतकी मोठी झाली हृतिकची दोन्ही मुलं, आता कसे दिसतात हृहान आणि हृदान? Ex पत्नीने शेअर केला फोटो

इतकी मोठी झाली हृतिकची दोन्ही मुलं, आता कसे दिसतात हृहान आणि हृदान? Ex पत्नीने शेअर केला फोटो

९०च्या दशकातील बॉलिवूडमधील हँडसम अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. आजही वयाच्या पन्नाशीत हृतिकने कमालीचा फिटनेस मेंनटेन केला आहे. एकेकाळी तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला हा अभिनेता आजही भल्याभल्या अभिनेत्यांना सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देतो. अभिनयाबरोबरच हृतिकच्या सिक्स पॅक्सचीही चर्चा होताना दिसते. पण, आता मात्र हृतिकच्या दोन्ही मुलांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

हृतिकची Ex पत्नी सुजैन खानने पहिल्यांदाच दोन्ही लेकांबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये हृतिकच्या दोन्ही मुलांची झलक पाहायला मिळत आहे. हृतिकप्रमाणेच त्याची दोन्ही मुलंदेखील हँडसम दिसत आहेत. हृतिकचा मोठा मुलगा हृहान आता १८ वर्षांचा झाला आहे. तर छोटा लेक हृदान १६ वर्षांचा आहे. सुजैनच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे. 


"एक हृतिकसारखा दिसतोय...आणि दुसरा तुझा भाऊ जायदसारखा", "हे मोठे कधी झाले", "हॉट मुलांची हॉट आई", "किती वर्षांनी यांना पाहिलं", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

दरम्यान, हृतिक आणि सुजैनने २००० साली लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर सहा वर्षांनी सुजैनने हृहान या त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर २००८ साली त्यांना हृदान हा मुलगा झाला. १४ वर्षांच्या सुखी संसारानंतर हृतिक आणि सुजैन घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. आता हृतिक सबा आजादसह रिलेशनशिपमध्ये आहे. तर सुजैन अर्सलान गोनीला डेट करत आहे. 

Web Title: hrithik roshan ex wife sussaine khan shared 2 childrens hrihaan and hridaan photo netizens reacted