Hrithik Roshan : वयाच्या ४९ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार ह्रतिक रोशन?,सबासोबत घेणार सातफेरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 01:02 PM2023-01-10T13:02:57+5:302023-01-10T13:04:57+5:30

हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.

Hrithik Roshan birthday actor planning wedding with girlfriend Saba Azad this year details inside | Hrithik Roshan : वयाच्या ४९ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार ह्रतिक रोशन?,सबासोबत घेणार सातफेरे

Hrithik Roshan : वयाच्या ४९ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार ह्रतिक रोशन?,सबासोबत घेणार सातफेरे

googlenewsNext

बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता हृतिक रोशन आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. लवकरच हृतिक दीपिका पादुकोणसोबत फायटर या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याच वेळी, आता बातम्या येत आहेत की बॉलिवूडचा ग्रीक गॉड यावर्षी त्याची गर्लफ्रेंड सबा आझादशी लग्न करण्याच्या तयारीत आहे. हृतिक रोशनचे कुटुंबही सबाबाबत खूप आनंदी आहे, कारण त्यांना वाटते की सबा या अभिनेत्यासाठी परफेक्ट असेल.

हृतिक रोशन आणि सबा आझाद अनेकदा एकत्र दिसले. कधी पार्टी तर कधी दोघेही सुट्टीचा आनंद लुटताना दिसतात. चाहत्यांनाही दोघांची जोडी आवडते. आता हृतिक आणि सबा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. हृतिक रोशनचे कुटुंबही सबा आणि त्यांच्या नात्याबद्दल खूप खुश आहेत. इतकंच नाही तर हृतिकची एक्स पत्नी सुजैन खान आणि मुलांसोबतही सबाचं चांगलं बॉन्डिंग आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्या लग्नाची माहिती दिली आहे. हृतिक आणि सबा दोघेही त्यांच्या लग्नाचे प्लॅनिंग करत आहेत, पण त्यात कोणतीही घाई नाही. या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्न करण्याचं प्लनिंग करतील. सध्या दोघेही त्यांच्या कामात व्यस्त आहेत. लग्न अजिबात भव्य होणार नाही आणि सुझान खानसह फक्त त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

हृतिक रोशन आजही त्याची एक्स पत्नी सुझैनसोबत चांगलं बॉन्डिंग शेअर  करतो. दोघेही अनेकदा त्यांच्या मुलांसोबत स्पॉट झाले आहेत. सुझान सध्या अर्सलान गोनीला डेट करत आहे. दोघेही अनेकदा त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करतात आणि पार्टीमध्ये एकत्र दिसतात. 


 

Web Title: Hrithik Roshan birthday actor planning wedding with girlfriend Saba Azad this year details inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.