ऋतिक रोशन- टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 17:11 IST2018-08-01T17:06:17+5:302018-08-01T17:11:05+5:30

टायगर श्रॉफ- ऋतिक रोशन दोघे ही फिटनेसचे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. हे दोघे स्टार एका सिनेमात दिसणार असतील तर त्यांचे फॅन्स नक्कीच खूष होतील

Hrithik Roshan and Tigar Shroff start working for a movie | ऋतिक रोशन- टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची तयारी

ऋतिक रोशन- टायगर श्रॉफने सुरु केली सिनेमाची तयारी

ठळक मुद्दे टायगर श्रॉफ ऋतिक रोशनपासून खूपच इन्स्पायरदेखील आहेदोघे लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत

टायगर श्रॉफ- ऋतिक रोशन दोघे ही फिटनेसचे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. हे दोघे स्टार एका सिनेमात दिसणार असतील तर त्यांचे फॅन्स नक्कीच खूष होतील. या सिनेमातील अॅक्शन सीन्स जबरदस्त बनवण्यासाठी इंटरनॅशनल स्टंट कॉरियोग्राफरला बोलवण्यात आले आहे. 

दोघे कोणत्या सिनेमात एकत्र दिसणार याबाबतचा खुलासा अजून करण्यात आलेला नाही. मात्र सिनेमाची स्पेशल तयारी सुरू करण्यात आली आहे. दोघे सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्स बॅनर अंतर्गत तयार होणाऱ्या सिनेमात दिसणार आहे.  ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या जोडीला एकत्र पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असेल कारण दोघेही डान्स आणि अ‍ॅक्शनमध्ये मास्टर आहेत. विशेषत: टायगर श्रॉफ ऋतिक रोशनपासून खूपच इन्स्पायरदेखील आहे असेही सांगितले जाते.    रिपोर्टनुसार ह्रतिक रोशनच्या अपोझिट वाणी कपूर दिसणार आहे. या सिनेमाची शूटिंग ऑक्टोबर 2019 महिन्यांपासून सुरु होणार आहे तर  हा सिनेमा 2020च्या फेब्रुवारी महिन्यांपर्यंत रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे. 

टायगर करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून  चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. सिनेमात अनन्याची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. तर ऋतिक सध्या  'सुपर ३०' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा पाटणाच्या आनंद कुमार याच्या जीवनावर आधारित आहे. आनंद कुमार बिहारात सुपर ३०'  नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.

Web Title: Hrithik Roshan and Tigar Shroff start working for a movie