हृतिक रोशन व सुजैन खान आपल्या नात्याला देणार दुसरी संधी? पुन्हा करणार लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 13:37 IST2018-01-16T08:07:38+5:302018-01-16T13:37:38+5:30
हृतिक रोशन आणि सुजैन खान या दोघांनी घटस्फोट घेतला तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. अनेकांना तर शेवटपर्यंत या बातमीवर ...

हृतिक रोशन व सुजैन खान आपल्या नात्याला देणार दुसरी संधी? पुन्हा करणार लग्न?
ह तिक रोशन आणि सुजैन खान या दोघांनी घटस्फोट घेतला तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. अनेकांना तर शेवटपर्यंत या बातमीवर विश्वास बसला नव्हता. पण ही बातमी खरी होती. आता या दोघांबद्दल एक वेगळीच बातमी आहे. होय, सुजैन व हृतिकच्या अतिजवळच्या मित्राचे मानाल तर हृतिक व सुजैन पुन्हा एकत्र येऊ शकतील. होय, हृतिक व सुजैनचा घटस्फोट झाला असला तरी हे दोघेही पुन्हा एकदा लग्न करू शकतात. दोघेही आपल्या नात्याला एक आणखी संधी देऊ इच्छितात. अर्थात यासाठी या दोघांनाही काही वेळ द्यायला हवा. अर्थात याबाबत हृतिक व सुजैनच्या कुटुंबीयांना विचारण्याचा प्रयत्न केला असता, असे काहीही नसल्याचे त्यांनी सांगितले.
सन २०१३ मध्ये हृतिक रोशन आणि सुजैन यान यांचे १७ वर्षांचे नाते संपुष्टात आले. हृतिक व सुजैन यांना बॉलिवूडमधील परफेक्ट कपल मानल्या जात असतानाच अचानक त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली. ही बातमी सगळ्यांसाठीच धक्कादायक होती. हृतिक व सुजैनचे नाते इतके विकोपाला का गेले, हे शेवटपर्यंत कळले नाही. आजही ते गुलदस्त्यात आहे. खरे तर यामागची अनेक कारणे सांगितली गेलीत. कधी हृतिकचे अफेअर तर कधी सुजैनची अर्जून रामपालसोबतची जवळीक पण सत्य काय, हे समोर आले नाहीच. मध्यंतरी सुजैन यावर बोलली होती.
ALSO READ : बर्थ डे बॉय हृतिक रोशनला एक्स-वाईफ सुजैन खानने दिल्या अशा शुभेच्छा!
हृतिक व माझ्यातील नाते एका अशा वळणावर पोहोचले होते, जिथून पुढे आम्हा दोघांसाठीही वेगळे राहणेच उत्तम होते. बनावट नाते सांभाळण्यापेक्षा सत्य स्वीकारणेच आम्ही चांगले समजले, असा खुलासा सुजैनने केला होता. पण आम्ही अद्यापही चांगले मित्र आहोत. सोबत असताना आम्ही जितके बोलत नव्हतो, त्यापेक्षा अधिक आत्ता आम्ही चॅट करतो. आम्हा मुलांसाठी आम्ही दोघेही कमालीचे कमिटेड आहोत. आमच्या मनात एकमेकांप्रती आदर आहे. मुलांसोबत असतो तेव्हा मतभेद विसरून आम्ही जगतो, असेही सुजैन म्हणाली होती.