हृतिक-कंगना वाद संपण्याची चिन्हे नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:19 IST2016-11-18T21:06:41+5:302016-12-01T16:19:19+5:30

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व अभिनेत्री कंगना राणौत यांच्यात असलेल्या ‘ई-मेल’ वादाची चौकशी पोलिसांनी बंद केली असल्याच्या बातम्या गुरुवारपासून ...

Hrithik-Kangna dispute does not end there | हृतिक-कंगना वाद संपण्याची चिन्हे नाहीत

हृतिक-कंगना वाद संपण्याची चिन्हे नाहीत

ong>बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व अभिनेत्री कंगना राणौत यांच्यात असलेल्या ‘ई-मेल’ वादाची चौकशी पोलिसांनी बंद केली असल्याच्या बातम्या गुरुवारपासून येत आहेत. मात्र शुक्रवारी हृतिकच्या वकिलांनी ‘वाद संपला नाही’ असा सांगून मीडियातील बातम्या चुकीच्या असल्याचा दावा केला आहे. यामुळे हृतिक व कंगनातील वाद सध्यातरी निवळण्याचे चिन्हे दिसत नाहीत.

हृतिक रोशनची बाजू महेश जेठमलानी यांच्या नेतृत्त्वातील वकिलांचा चमू हाताळत आहेत. या चमूने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी हृतिक रोशन आणि कंगना राणौत यांच्यात असलेल्या प्रकरणाची चौकशी बंद केलेली नाही. हृतिक व कंगना यांच्यातील वादाची चौकशी पोलिसांनी बंद केली असल्याच्या बातम्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाºया असल्याचे महेश जेठमलानी यांनी सांगितले. 

हृतिकची बाजू मांडणाºया वकिलांचे स्टेटमेंट 
‘‘हृतिक रोशन आणि कंगना राणौत यांच्या ई-मेलची चौकशी पूर्ण झाल्याच्या मीडियामध्ये बातम्या येत आहेत त्या सर्व आधारहीन आहेत. मीडियातील एक गट राणौतच्या वकिलांसोबत एकत्र येऊन अशा प्रकारची चुकीची माहिती पसरवित आहे. वास्तवात चौकशी सुरू आहे आणि सक्सेना (पोलीस सह आयुक्त - क्राईम) यांनी जेठमलानी यांना सूचित केले आहे की केस अद्याप बंद करण्यात आलेली नाही. येथे स्पष्ट करण्यात आले आहे की, असे सबळ पुरावे आहेत ज्यामधून असे दिसते की,  रोशन आणि राणौत यांच्यात कोणतेही विशेष नाते नव्हते आणि राणौत यांनी सतत रोशन यांना इमेल्स करून त्रास दिला. यामागील हेतू रोशन यांच्यासोबत नाते सुरू करता यावे हे होते. 

Web Title: Hrithik-Kangna dispute does not end there