कॅमेरा बंद होताच फराह खान कशी वागते? कूक दिलीपने सगळं सांगितलं, म्हणाला- "ती मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:45 IST2025-08-05T16:44:06+5:302025-08-05T16:45:40+5:30
फराह खान आणि दिलीपची जोडी सध्या चांगलीच गाजतेय. फराह खान ऑफ कॅमेरा कशी वागते, याचा खुलासा दिलीपने केलाय

कॅमेरा बंद होताच फराह खान कशी वागते? कूक दिलीपने सगळं सांगितलं, म्हणाला- "ती मला..."
फराह खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक आहे. ती सध्या एक व्लॉग सिरीज करत आहे, ज्यामध्ये ती आपल्या ओळखीच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या स्वयंपाकघरात काही वेळ घालवते. नुकताच तिचा एक व्लॉग अभिनेता बोमन इराणी यांच्या घरी शूट करण्यात आला होता. या व्लॉगमध्ये फराहसोबत तिचा कुक दिलीप देखील होता. फराह - दिलीपची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडतेय. या व्लॉगमध्ये ऑफ कॅमेरा फराह कशी आहे, याचा खुलासा दिलीपने केला.
कॅमेरा बंद झाल्यावर फराह कशी वागते?
या व्लॉगमध्ये दिलीपने फराहच्या काही खास सवयींवर प्रकाश टाकला. जेव्हा फराहने त्याला विचारलं की ती कॅमेरासमोर आणि कॅमेराच्या बाहेर कशी असते, तेव्हा दिलीप हसून म्हणाला की, "कॅमेरासमोर फराह मस्त आणि शांत असते, पण कॅमेराच्या बाहेर ती खूप खडूस आहे." हे ऐकून सर्वजण हसू लागले. दिलीपने हे गमतीत म्हटलं तरी सर्वांच्या चेहऱ्यावर हशा पिकला. फराह सुद्धा दिलीपच्या उत्तराने थक्क झाली. पण नंतर ती सुद्धा खळखळून हसली.
यानंतर बोमन इराणीने दिलीपला विचारलं की, फराह आत्ता डाएटवर आहे का. त्यावर दिलीपने सांगितलं की, फराह मॅडमचं खाण्यावर तिला खूप प्रेम आहे. ती स्वतः डाएट फॉलो करत असली तरी चांगलं आणि भरपूर खाणं गुपचुप खाते. या व्लॉगमध्ये फराहने थट्टेने असंही म्हटलं की, “बोमनसाठी मी कधीकाळी कास्टिंग काऊच करायला तयार होते... पण हे माझ्या नवऱ्याला म्हणजे शिरीषला सांगू नकोस!” यावर सर्वांनीच खळखळून हसू दिलं. अशाप्रकारे फराह आणि दिलीप या खास जोडीची केमिस्ट्री सर्वांना आवडली. फराहने दिलीपच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलला आहे