Hotness Alert ! क्लीवेज शो ऑफ करताना दिसली राधिका आपटे, तर युजर्स म्हणाले......

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 04:27 PM2019-10-03T16:27:12+5:302019-10-03T16:37:27+5:30

राधिका आपटे बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे.

Hotness Alert ! Radhika Apte sets the temperature soaring with her ravishing avatar in black shimmery dress | Hotness Alert ! क्लीवेज शो ऑफ करताना दिसली राधिका आपटे, तर युजर्स म्हणाले......

Hotness Alert ! क्लीवेज शो ऑफ करताना दिसली राधिका आपटे, तर युजर्स म्हणाले......

googlenewsNext

राधिकाची प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते तितकीच तिची स्टाईलही खास असते. राधिकाचे फॅन्स आज जगभर पसरलेत. तसेच राधिका आपटे बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे, कुणाचीही विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख. वैयक्तीक असो वा व्यावसायिक कोणत्याही गोष्टीवर आपलं ठाम मत मांडताना ती जराही कचरत नाही. नुकतंच राधिकाने एका अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी नेहमीप्रमाणे राधिकाने बोल्ड अंदाजात दिसली. 


मुळात तिने परिधान केलेला ड्रेसही तितकाच स्टायलिश होता. पण या ड्रेसमध्ये ती क्वीवेज शो ऑफ करताना दिसली. राधिक सुंदर तर दिसतेच आहे शिवाय तिच्या अदा तितक्याच बोल्ड आणि अंदाजही हॉट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तिच्या या फोटोंवर आणि व्हिडीओवर नेटीझन्स संमिश्र प्रतिक्रीया देत आहेत. विशेष म्हणजे तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच पाहायला मिळत आहे. राधिका आपटे सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. ती नेहमी सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असते. नेहमीच आपले वेगवगेळ्या अंदाजातील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत रसिकांची वाहवा मिळवत असते. 


राधिका आता अ‍ॅपलच्या नवीन सीरिजमध्ये झळकणार आहे. या सीरिजचं नाव आहे शांताराम. ही सीरिज ग्रेजोरी डेविड रॉबर्ट्स यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. राधिकासोबत या वेबसीरिजमध्ये रिचार्ड रॉक्सबर्ग आणइ चार्ली हन्नम या हॉलिवूडच्या स्टारसोबत झळकणार आहे. राधिका या सीरिजमध्ये कविताची भूमिका साकारणार आहे. जी भारतीय पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.शांताराम (Shantaram) या सीरिजमध्ये एकूण १० एपिसोड असून यातील दोन भागांचं दिग्दर्शन जस्टीन कुर्झेल करणार आहे. या वेबसीरिजच्या शूटिंगला लवकरच ऑस्ट्रेलियात सुरूवात होणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये भारतात होणार आहे. राधिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती द वेडिंग गेस्ट चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता देव पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Hotness Alert ! Radhika Apte sets the temperature soaring with her ravishing avatar in black shimmery dress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.