Hotness Alert! आमिर खानची लेक इरा खानने केले बोल्ड फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 15:00 IST2019-09-22T15:00:00+5:302019-09-22T15:00:01+5:30
काही दिवसांपूर्वी इरा तिच्या बॉयफ्रेन्डमुळे चर्चेत आली होती. पण सध्या ती तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे.

Hotness Alert! आमिर खानची लेक इरा खानने केले बोल्ड फोटोशूट
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याची मुलगी इरा तशी कॅमे-यांपासून दूर राहणे पसंत करते. पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे असंख्य चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी इरा तिच्या बॉयफ्रेन्डमुळे चर्चेत आली होती. पण सध्या ती तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. होय, इराने स्वत:चे काही हॉट फोटो शेअर केलेत. या फोटोमधील इराचा हॉट अंदाज पाहुन चाहते तर अक्षरश: थक्क झालेत.
यापैकी फोटोंमध्ये इरा रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशनच्या ड्रेसमध्ये आहे तर तिच्या हातात वाईनचा ग्लास आहे. विशेष म्हणजे, तिस-या फोटोत एखाद्या अभ्यासू मुलीप्रमाणे इरा घरच्या सोफ्यावर बसून अभ्यास करताना दिसत आहे.
Saturday night vibe...v/s My actual Saturday night असे कॅप्शन देत इराने इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
काही दिवसांपूर्वीच स्वत: इराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. यानंतर इरा व मिशाल यांचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
इराच्या करिअरबद्दल सांगायचे झाल्यास, तिला फिल्ममेकिंगमध्ये रस आहे. अलीकडे आमिरने याबद्दल माहिती दिली होती. मुलगी इराला फिल्ममेकिंगमध्ये आणि मुलगा जुनैद याला अॅक्टिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा असल्याचे तो म्हणाला होता. त्यानुसार इराने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. 'Euripides Medea' हे नाटक ती दिग्दर्शित करणार आहे. या नाटकातून युवराज सिंगची पत्नी हेजल किच अूॅक्टिंगच्या दुनियेत कमबॅक करतेय.