कॅटरिनाचा मालदीवमध्ये ‘हॉट फोटोशूट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 16:54 IST2016-11-26T16:54:33+5:302016-11-26T16:54:33+5:30

katrina kaif hot photoshoot in maldives ; अभिनेत्री कॅटरिना कैफने मालदिवमध्ये एका मॅगझिनसाठी स्विमवेअर कलेक्शनसाठी ‘हॉट फोटोशूट’ केला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

'Hot Photoshoot' in Catalina Maldives! | कॅटरिनाचा मालदीवमध्ये ‘हॉट फोटोशूट’!

कॅटरिनाचा मालदीवमध्ये ‘हॉट फोटोशूट’!

ong>बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’ कॅटरिना कैफ सोशल मीडियावर आल्यापासून तिच्या अ‍ॅक्टिव्हिटीची माहिती मिळाला लागली आहे. मीडियापासून दूर राहणारी कॅटरिना सध्या मालदिवमध्ये असून तेथे कामसोबतच चांगलीच मस्ती करतान दिसते आहे. कॅटरिनाने एका फॅशन मॅगझिनसाठी मालदिवमध्ये हॉट फोटो शूट केला आहे.

अभिनेत्री कॅटरिना कैफ हिला हॉट फोटोशूट करण्यासाठी तिला मालदीव गाठावे लागले. या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर अपलोड केले आहेत. सध्या तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. हार्पर बाझार ब्राईड इंडिया या फॅशन मॅगझिनसाठी ‘मेलिशा ओडबेस’च्या स्विमवेअरसाठी कॅटरिनाने फोटोशूट केला आहे. अर्थातच या फ ोटोंमध्ये ती हॉट अंदाजात दिसेल. कॅटरिनाने परिधान केलेल्या पांढºया स्विमवेअर तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. सध्या तरी कॅटने एकच फ ोटो अपलोड केला आहे. 

">http://


फोटो शेअर करताना कॅटरिना लिहते, ‘या जागी पोहचायला आम्हाला १२ तासांचा प्रवास करावा लागला. यासाठी आम्ही तिन विमाने बदलली.’ यावरून तिची फोटोशूटबद्दलची उत्सुकता किती असेल याची जाणीव होते. या फोटोशूटच्यावेळी डिझायनर मनीष मल्होत्रा देखील शूटिंगला उपस्थित होता त्यानेही तेथील एक व्हिडीओ अपलोड केला आहे. यामुळे या फोटोशूटचे आणखी फोटो तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 

कॅटरिना आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात दिसेल. यात ती रणबीर कपूरच्या अपोझिट आहे. यासोबतच सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला ‘एक था टायगर’चा सिक्वल असलेल्या ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘टायगर जिंदा है’ मध्ये ती निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. 

">http://


Web Title: 'Hot Photoshoot' in Catalina Maldives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.