​सिद्धार्थच्या दिमतीला हॉलीवूड स्टंट दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 12:24 IST2016-10-27T12:24:38+5:302016-10-27T12:24:38+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा ‘फिटनेस फ्रीक’ म्हणून ओळखला जातो. जिममध्ये व्यायाम करतानाचे व्हिडिओज् आणि फोटो सोशल मीडियावर तो शेअरही करत असतो. ...

Hollywood stunt director Siddhartha's granddaughter | ​सिद्धार्थच्या दिमतीला हॉलीवूड स्टंट दिग्दर्शक

​सिद्धार्थच्या दिमतीला हॉलीवूड स्टंट दिग्दर्शक

द्धार्थ मल्होत्रा ‘फिटनेस फ्रीक’ म्हणून ओळखला जातो. जिममध्ये व्यायाम करतानाचे व्हिडिओज् आणि फोटो सोशल मीडियावर तो शेअरही करत असतो. त्याची हीच फिटनेसची आवड आता तो आणखी एक पाऊल घेऊन जातोय.

त्याच्या आगामी चित्रपटातील स्टंट जागतिक दर्जाचे होण्यासाठी त्याने थेट हॉलीवूड एका प्रसिद्ध स्टंट कोरिओग्राफर बोलवला आहे. ‘ट्रान्सपोर्टर’ फेम स्टंट दिग्दर्शक सिरिल रॅफॅली सध्या सिद्धार्थला ट्रेनिंग देत आहे. तो सांगतो की, ‘सिरिल सहा प्रकारच्या ‘मार्शल आर्टस्’मध्ये पारांगत असून सगळ्यांचे मिश्रण करून तो मला प्रशिक्षण देत आहे.

त्याबरोबरच ‘क्राव मागा’ म्हणजेच हँड-टू-हँड फाईटचे विशेष ट्रेनिंगसुद्धा तो घेत आहे. स्टंट करण्यासाठी लागणारी चपळता व लवचिकता यामुळे मिळते. जेणेकरुन अवघडातील अवघड स्टंट सफाईदारपणे करण्यास मदत होईल. राज आणि डीके ही दिग्दर्शक जोडी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. जॅकलिन फर्नांडिस मुख्य अभिनेत्री आहे. 

                                  Cyril Raffaelli
                                             स्टंट कोरिओग्राफर : सिरिल रॅफॅली

तत्पूर्वी सिद्धार्थने ट्विटरवर ‘#सिदफिट’ नावाने हॅशटॅग टाकून इंटेन्स एक्सरसाईज करतानाचे फोटो शेअर केले. त्याची ही मेहनत पाहून चाहतेसुद्धा प्रभावित झाले. म्हणून तर हा हॅशटॅग सध्या ट्रेंडिंग होतोय. 

Web Title: Hollywood stunt director Siddhartha's granddaughter