सुनिधी चौहानचा संसार मोडला? पतीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 13:37 IST2020-04-22T11:41:03+5:302020-04-22T13:37:49+5:30

सुनिधी सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

hitesh sonik response on the rumors of separation with sunidhi chauhan-ram | सुनिधी चौहानचा संसार मोडला? पतीने केला खुलासा

सुनिधी चौहानचा संसार मोडला? पतीने केला खुलासा

ठळक मुद्देहे सुनिधीचे दुसरे लग्न आहे. याआधी सन 2002 मध्ये तिने कोरिओग्राफर बॉबी खानसोबत लग्न केले होते.

बॉलिवूड सिंगर सुनिधी चौहानला कोण ओळखत नाही. आपल्या गोड आवाजाने संगीतप्रेमींना वेड लावणारी हीच सुनिधी सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, सुनिधी आणि तिचा पती हितेश सोनिक एकमेकांपासून विभक्त झाल्याची चर्चा आहे. लॉकडाऊनदरम्यान सुनिधी व हितेशचा आठ वर्षांचा संसार संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. सुनिधीने या चर्चेवर बोलण्यास नकार दिला. पण हो तिचा पती हितेशने मात्र यावर खुलासा केला आहे.

चर्चा खरी मानाल तर सुनिधी व हितेश गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे राहत आहेत. मात्र त्यांनी हे जगापासून लपवून ठेवले. सूत्रांच्या मते,  सुनिधी व हितेश आपल्या मित्रांसोबत गोव्याच्या ट्रिपवर गेले होते. तेथून परत आल्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेलेत.

सुनिधी व हितेशच्या लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 साली दोघांनी लग्न केले होते. गोव्यात या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन दिले होते.
लग्नानंतर पाच वर्षांनी  सुनिधीच्या मुलाचा जन्म झाला होता. सुनिधी अनेकदा आपल्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
हे सुनिधीचे दुसरे लग्न आहे. याआधी सन 2002 मध्ये तिने कोरिओग्राफर बॉबी खानसोबत लग्न केले होते. त्यावेळी ती केवळ 18 वर्षांची होती. मात्र लग्नानंतर उण्यापु-या वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाला होता.

हितेशने केला खुलासा
सुनिधी पतीपासून विभक्त झाल्याची चर्चा असताना तिचा पती हितेशने मात्र ही सगळी चर्चा खोटी असल्याचे स्पष्ट केले. बॉम्बे टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हितेशने असे काहीही नसल्याचे सांगितले. तो म्हणाला की, आम्ही एकाच घरात, एकाच छताखाली एकत्र राहत आहोत. लॉकडाऊनदरम्यान घरातील कामे आम्ही वाटून घेतली आहेत. कदाचित सुनिधी माझ्या घरातील कामांवर खुश नाही, म्हणून अशी चर्चा सुरु झालीय, असे तो हसत हसत म्हणाला.

Web Title: hitesh sonik response on the rumors of separation with sunidhi chauhan-ram