अमृता फडणवीस यांनी कैलाश खेर यांच्यासोबत गायलं 'हे राम' भजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 12:17 PM2024-01-21T12:17:22+5:302024-01-21T12:18:45+5:30

प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या सुमधुर आवाजातील भजन गीत लाँच करण्यात आले आहे.

“Hey Ram" by Kailash Kher and Amruta Fadnavis Releases as a Tribute to the Pran Pratishtha Ceremony | अमृता फडणवीस यांनी कैलाश खेर यांच्यासोबत गायलं 'हे राम' भजन

अमृता फडणवीस यांनी कैलाश खेर यांच्यासोबत गायलं 'हे राम' भजन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.  त्या एक उत्तम गायिकाही आहेत. त्यांची सगळीच गाणी चर्चेत येतात. अमृता फडणवीस सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. सध्या त्यांच एक नवं गाणं चर्चेत आलं आहे.  

देशभरात सध्या  २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरु आहे. रामललाच्या आगमनामुळे अवघा भारत देश राममय झाला आहे. यातच अमृता फडणवीस यांनी कैलाश खेर यांच्यासोबत 'हे राम' हे भजन गायलं आहे. प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या सुमधुर आवाजातील भजन गीत लाँच करण्यात आले आहे. या भजन गीतमध्ये अमृता फडणवीस यांनी त्यांना साथ दिली आहे. 

अमृता फडणवीस यांनी कैलाश खेर यांच्यासह या पोस्टरचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं, ‘हे राम’ हे भजन गीत सुखद आनंदाची अनुभूती आहे. भारतातील राममय सोहळ्यात रामभक्तीपर भजन गीत गाण्याचे सौभाग्य मला मिळाले, यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजते'. अमृता फडणवीस यांनी गायलेलं हे भजन ऐकण्यासाठी https://lnk.to/6fcV4jPo ही लिंक शेअर केली आहे. शिवाय लवकरच या भजनाचा व्हिडीओ येणार असल्याचं त्यांनी पोस्टद्वारे सांगितलं.त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

अमृता फडणवीस या बँकर आहेत. मात्र त्यांना गायनाची प्रचंड आवड आहे. याआधीही त्यांचे म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी देखील अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. त्यांनी गायलेले 'शिव तांडव स्तोत्र' देखील चांगलेच लोकप्रिय झाले. तर अमृता फडणवीस यांचं 'मूड बना लिया' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं. या गाण्यालाही नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती. तसेच त्यांचं 'सारे जहाँ से अच्छा' हे देशभक्तीपर गाणंदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.  

Web Title: “Hey Ram" by Kailash Kher and Amruta Fadnavis Releases as a Tribute to the Pran Pratishtha Ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.