Here's a proof : ​विन डिझेलला पुन्हा आली दीपिका पादुकोणची आठवण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 16:04 IST2017-07-30T10:32:43+5:302017-07-30T16:04:49+5:30

हॉलिवूड स्टार विन डिझेल आणि दीपिका पादुकोण या दोघांचा ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा चित्रपट आता अनेकांच्या विस्मृतीतही गेला असेल. पण विन डिझेलचे म्हणाल तर त्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.

Here's a proof: Vin Diesel came again to remind Deepika Padukone! | Here's a proof : ​विन डिझेलला पुन्हा आली दीपिका पादुकोणची आठवण!

Here's a proof : ​विन डिझेलला पुन्हा आली दीपिका पादुकोणची आठवण!

लिवूड स्टार विन डिझेल आणि दीपिका पादुकोण या दोघांचा ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा चित्रपट आता अनेकांच्या विस्मृतीतही गेला असेल. पण विन डिझेलचे म्हणाल तर त्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. होय, या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत घालवलेले क्षण त्याला आठवताहेत. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर दीपिकाच्या आठवणीने विन व्याकूळ झाला आहे. 
 


विनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेरेना उंगेरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. (आता ही सेरेना उंगेर कोण, कृपया हे विचारू नका. अहो,‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’ या चित्रपटात दीपिकाने सेरेना उंगेरची भूमिका साकारली आहे.) विन याने शेअर केलेला हा फोटो मुंबईचा आहे. मुंबईत विन आणि दीपिका दोघेही स्पेशन कटिंग चहाचा आनंद घेत असतानाचा हा फोटो आहे. हा फोटो शेअर करताना विनने लिहिलेय,‘ट्रिपल एक्स थर्सडे.’ आता ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’ रिलीज होऊन इतके दिवस झाल्यानंतर विनला दीपिकासोबतचा त्याचा फोटो शेअर करावासा वाटावा, यातच सगळे आले. तसेही विन हा आपल्या आयुष्यभराचा मित्र झाल्याचे दीपिकाने आधीच जाहीर करून टाकले आहे. ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’च्या सेटवर विन आणि दीपिकाचे चांगलेच बॉन्डिंग झाले होते. विनसोबतच्या पहिल्या भेटीबद्दलही दीपिका बोलली होती. तिने सांगितले होते की, विन लॉस एंजिल्समध्ये होता आणि मी टोरंटोत. मी टोरंटोत असल्याचे त्याला कळले. त्याने मला फोन केला व मला भेटायला ये, असे सांगितले. त्यामुळे मी रात्रीची फ्लाईट घेऊन लॉस एंजिल्सला पोहोचले आणि इथे जावून अर्ध्या रात्री ४५ मिनिटांचे प्रोफेशनल फोटोशूट केले. काय होतय, हे मला त्यावेळी कळलेच नाही. तोपर्यंत ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’मध्ये मी आहे वा नाही, हे मला ठाऊक नव्हते. विनने माझा एक फोटो उचलला. तू माझा फोटो उचललास म्हणजे मी या चित्रपटात आहे, अशी मी आशा करते, असे मी त्याला म्हटले. पण विन यावर काहीही बोलला नव्हता.

Web Title: Here's a proof: Vin Diesel came again to remind Deepika Padukone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.