हम आपके है कौनमधील रिटाने केले आहे या अभिनेत्यासोबत लग्न, आता तिला ओळखणे देखील होतंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 20:16 IST2019-08-05T20:15:31+5:302019-08-05T20:16:13+5:30
हम आपके है कौन या चित्रपटातील रिटाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रेम म्हणजेच सलमान खानच्या मागे पुढे करणारी रिटा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

हम आपके है कौनमधील रिटाने केले आहे या अभिनेत्यासोबत लग्न, आता तिला ओळखणे देखील होतंय कठीण
हम आपके है कौन या चित्रपटाला २५ वर्षं पूर्ण झाली असली तर या चित्रपटाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाहीये. या चित्रपटातील प्रेम, निशा, पूजा या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले होते. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची कथा, या चित्रपटाची गाणी सगळेच काही प्रेक्षकांना भावले होते. या चित्रपटाने त्यावेळी अनेक पुरस्कार मिळवले होते. सगळ्या कुटुंबांनी एकत्र पाहायला चित्रपट अशी या चित्रपटाची त्याकाळात ओळख निर्माण झाली होती.
हम आपके है कौन या चित्रपटातील रिटाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रेम म्हणजेच सलमान खानच्या मागे पुढे करणारी रिटा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ही भूमिका साहिला चड्डाने साकारली होती. या चित्रपटानंतर आपल्याला ती फारशी कुठे दिसली नाही. साहिलाने काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्यासोबत लग्न केले असून आज ती तिच्या खाजगी आयुष्यात प्रचंड खूश आहे. तिचे लग्न निमई बाली सोबत झाली असून तो एक प्रसिद्ध अभिनेता आहे.
त्याने चंद्रकांता या मालिकेत सूर्या ही भूमिका साकारली होती. तसेच सीआयडी या मालिकेत देखील तो झळकला होता. महाकाव्य महाभारत ही मालिका काही महिन्यांपूर्वी चांगलीच गाजली होती. या मालिकेमध्ये तो दुर्योधनच्या भूमिकेत दिसला होता. त्याने काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. निमई हा संजय दत्तचा कझिन असून त्याच्या अनेक पार्टींमध्ये त्याला पाहायला मिळते.
साहिलाने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मिस इंडिया हा किताब जिंकला होता. त्यानंतर ती हम आपके है कौन सोबतच भाभी, सैलाब, माँ, अब इन्साफ होगा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली.
पण हम आपके है कौन वगळता कोणत्याच चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना भावली नाही. ती गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर असून तिने शेवटचे २०१४ मध्ये एका शॉर्टफिल्ममध्ये काम केले होते.