आयुषमान खुरानाला कोणत्या गोष्टीसाठी मिळताहेत शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 19:40 IST2018-09-08T19:36:51+5:302018-09-08T19:40:03+5:30

अभिनेता आयुषमान खुरानाला सोशल मीडिया व ट्विटरवर  #BadhaaiHo हा हॅशटॅग वापरून बॉलिवूडमधील सेलिब्रेटी शुभेच्छा देत आहेत. मात्र ह्या शुभेच्छा कशासाठी देत आहेत, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

here is why bollywood is wishing ayushmann khurrana and sanya malhotra badhaai ho | आयुषमान खुरानाला कोणत्या गोष्टीसाठी मिळताहेत शुभेच्छा

आयुषमान खुरानाला कोणत्या गोष्टीसाठी मिळताहेत शुभेच्छा

ठळक मुद्देआयुषमान आणि सान्या ‘बधाई हो’ चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत‘बधाई हो’ चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता आयुषमान खुरानाला सोशल मीडिया व ट्विटरवर  #BadhaaiHo हा हॅशटॅग वापरून बॉलिवूडमधील सेलिब्रेटी शुभेच्छा देत आहेत. मात्र ह्या शुभेच्छा कशासाठी देत आहेत, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. आयुषमान खुरानाला टॅग करून स्वरा भास्कर, भूमी पेडणेकर, सुनिधी चौहान आणि आता करण जोहर यांसारख्या सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा देण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दंगल गर्ल म्हणजेच अभिनेत्री सान्या मल्होत्राने सर्वांत आधी ट्विटरवर आयुषमानला शुभेच्छा दिल्या. तिने लिहिले की, येत्या काही दिवसांत आयुषमान तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी सांगणार आहे. सर्वांनी त्याला शुभेच्छा द्याव्यात ही विनंती. सान्याच्या या ट्विटने सर्वांनाच पेचात पाडले आहे. याबद्दल आयुषमान काही सांगेल म्हणून सेलिब्रेटींनी त्याला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. बघता बघता हा हॅशटॅग सोशल मीडियावर जोरदार ट्रेण्ड होऊ लागला आणि आयुषमान नेमकी कोणती बातमी सांगणार आहे याची उत्सुकता आणखीन वाढली आहे. खरेतर सर्वांकडून मिळणाऱ्या या शुभेच्छांना पाहून आयुषमान सुद्धा वैतागला आहे.


आयुषमान आणि सान्या आगामी ‘बधाई हो’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. कदाचित म्हणूनच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सान्याने हा अनोखा फंडा वापरला असावा. अमित शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’ चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या शुभेच्छांमागचे नेमके कारण कदाचित चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.
 

Web Title: here is why bollywood is wishing ayushmann khurrana and sanya malhotra badhaai ho