राजू इज बॅक! Hera Pheri 3 च्या शूटिंगला सुरुवात; सिनेमाच्या पहिल्या प्रोमोची चाहत्यांना उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 10:51 AM2023-02-22T10:51:55+5:302023-02-22T16:19:01+5:30

हिंदी सिनेमातील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'हेरा फेरी'.

Hera Pheri 3 shoot begins akshay kumar is back as raju promo releasing soon | राजू इज बॅक! Hera Pheri 3 च्या शूटिंगला सुरुवात; सिनेमाच्या पहिल्या प्रोमोची चाहत्यांना उत्सुकता

राजू इज बॅक! Hera Pheri 3 च्या शूटिंगला सुरुवात; सिनेमाच्या पहिल्या प्रोमोची चाहत्यांना उत्सुकता

googlenewsNext

Hera Pheri 3 : हिंदी सिनेमातील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'हेरा फेरी'. परेश रावल (Paresh Rawal), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) या तिकडीने 'हेरा फेरी' मधून प्रेक्षकांना पोट धरुन हसवले. आता लवकरच सिनेमाचा तिसरा भाग सुद्धा येणार आहे. 'हेरा फेरी ३' च्या शूटिंग सुरुवात झाल्याची माहिती मेकर्सने दिली आहे. पण या तिसऱ्या भागात 'राजू' म्हणजेच अक्षय कुमार असेल की नाही यावर शंका होती कारण अक्षयने सिनेमाला नकार दिला होता. मात्र आता अक्षय कुमारच 'राजू' ची भूमिका साकारेल  हे स्पष्ट झाले असून चाहते तर भलतेच खूश झालेत.

गेल्या अनेक दिवसांपासून 'हेरा फेरी ३'ची चर्चा आहे. हेरा फेरीचा तिसरा भाग येणार म्हणून चाहते खूष होते पण यात अक्षय कुमार नसेल हे ऐकल्यावर प्रेक्षकांमध्ये चांगलीच नाराजी होती. हेरा फेरी ३ मध्ये कार्तिक आर्यन राजू ची भूमिका साकारणार हे जवळपास निश्चित झाले होते. तसेच अक्षयनेही एका मुलाखतीत हेरा फेरी ३ ची स्क्रीप्ट आवडली नसल्याचं सांगितलं होतं.

'हेरा फेरी ३' प्रोमो 

'हेरा फेरी ३' च्या एकंदर चर्चांनंतर आता चाहत्यांसाठी सिनेमाता एक छोटा प्रोमोही रिलीज करण्यात येणार आहे. प्रोमोचे शूटही पूर्ण झाले आहे. ओरिजिनल कलाकारांसोबतच हेरा फेरी ३ येत आहे हेच प्रोमोमधून दाखवण्यात येणार आहे. फरहाद सामजी सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.

हेरा फेरी 2000 मध्ये रिलीज झाला होता तर फिर हेरा फेरी २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिला हेरा फेरी येऊन २२ वर्ष झाली मात्र सिनेमाची क्रेझ अजुनही कायम आहे. आता पुन्हा एकदा बाबू भैय्या, राजू आणि श्याम हे तिघेही पुन्हा चाहत्यांना हसवायला येत आहेत.

Web Title: Hera Pheri 3 shoot begins akshay kumar is back as raju promo releasing soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.