हेमा मालिनींचे रुपेरी पडद्यावर कमबॅक, वयाने लहान असलेल्या अभिनेत्यासोबत करणार रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 20:15 IST2019-12-26T20:13:32+5:302019-12-26T20:15:46+5:30

Shimla Mirchi Trailer : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहेत.

Hema Malini's comeback on screen, romance with actor younger | हेमा मालिनींचे रुपेरी पडद्यावर कमबॅक, वयाने लहान असलेल्या अभिनेत्यासोबत करणार रोमान्स

हेमा मालिनींचे रुपेरी पडद्यावर कमबॅक, वयाने लहान असलेल्या अभिनेत्यासोबत करणार रोमान्स


बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहेत. इतकंच नाही तर त्या या चित्रपटात त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्यासोबत रोमांस करताना दिसणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे शिमला मिरची. या चित्रपटात हेमा मालिनी यांच्यासोबत अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

शिमला मिरची या चित्रपटात राजकुमार हा रकुलच्या प्रेमात पडतो मात्र तो तिच्याजवळ प्रेमाची कबूली देऊ शकत नाही. त्यामुळे तो तिच्या घरात पत्र टाकतो. मात्र ते पत्र रकुलची आई हेमा मालिनीला मिळतात. हेमा मालिनी राजकुमारच्या प्रेमात पडतात व तिथूनच सुरू होतो हा प्रेमाचा तिहेरी खेळ. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केलं आहे.


हेमा मालिनी यापूर्वी २०१७ साली चित्रपट एक थी रानी ऐसी भीमध्ये झळकल्या होत्या. मृदुला सिन्हा यांची बायोग्राफी राजपथ से लोकपथवर बनलेल्या या चित्रपटात हेमा मालिनी यांनी विजया राजे सिंधिया यांची भूमिका साकारली होती.

याशिवाय २०२०मध्ये प्रदर्शित होणारा तमीळ चित्रपट वलिमाईमध्ये अजित कुमारच्या आईच्या भूमिकेत हेमा मालिनी दिसणार आहेत.

Web Title: Hema Malini's comeback on screen, romance with actor younger