काय सांगता! 'आदिपुरुष'मध्ये प्रभासच्या आईची भूमिका साकारणार बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 15:53 IST2021-02-10T15:48:00+5:302021-02-10T15:53:31+5:30

'आदिपुरुष' तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज करण्यात येणार आहे.

Hema malini to become the mother of prabhas in adipurush | काय सांगता! 'आदिपुरुष'मध्ये प्रभासच्या आईची भूमिका साकारणार बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

काय सांगता! 'आदिपुरुष'मध्ये प्रभासच्या आईची भूमिका साकारणार बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

प्रभास सध्या बर्‍याच प्रोजेक्टवर काम करतो आहे. त्यापैकी 'आदिपुरुष' हा त्याचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. हा सिनेमा पौराणिक कथा रामायणवर आधारित आहे, ज्यामध्ये प्रभास श्री रामची भूमिका साकारणार आहेत आणि सैफ अली खान रावणच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मेगा बजेट सिनेमाची निर्मिती टी-सीरीज करणार आहे. 'आदिपुरुष' तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज करण्यात होईल. तन्हाजी फेम ओम राऊत या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय.

 ‘आदिपुरुष’मध्ये कौशल्याच्या भूमिकेसाठी बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचं नाव समोर येत आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी हेमा मालिनींसोबत  या भूमिकेविषयी चर्चा केली आहे. हेमा मालिनी इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास उत्सुक आहे पण अद्याप काही फायनल झालेले नाही. हेमा मालिनी यांचं चाहते त्यांना कौशल्याच्या भूमिकेत बघण्यासाठी उत्सुक आहेत. पिंकविला रिपोर्टनुसार 'आदिपुरुष'चा एकूण बजेट 350 ते 400 कोटींचा आहे.

भूमिकेसाठी खास तयारी 
बाहुबली सिनेमात प्रभास एक योद्धा म्हणून समोर आला होता. पण ‘आदिपुरूष’मध्ये त्याची भूमिका थोडी वेगळी आहे. या सिनेमात त्याला एक योद्धा कमी आणि धनुर्धर अधिक दिसायचं आहे. यासाठी प्रभासने एक्सपर्टसोबत बोलणी केली आहे. त्याने शरीरावर कामही सुरू केलंय. काही दिवसात प्रभास धनुर्विद्याही शिकणार आहे.
 

Web Title: Hema malini to become the mother of prabhas in adipurush