नमस्कार... कपिल शर्मांनं चाहत्यांना दिली गुडन्यूज, दुसऱ्यांदा झाला 'बाप'माणूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 08:49 IST2021-02-01T08:44:33+5:302021-02-01T08:49:54+5:30

करवा चौथ निमित्तीने कपिलची चांगली मैत्रीण भारती इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती. त्यावेळेस गिन्नी बेबी बंपसोबत दिसली होती. एवढेच नाही तर दिवाळीच्या फोटोत गिन्नीचा बेबी बंप दिसला होता

Hello ... Kapil Sharma gave good news to the fans, for the second time he became a 'father' man | नमस्कार... कपिल शर्मांनं चाहत्यांना दिली गुडन्यूज, दुसऱ्यांदा झाला 'बाप'माणूस

नमस्कार... कपिल शर्मांनं चाहत्यांना दिली गुडन्यूज, दुसऱ्यांदा झाला 'बाप'माणूस

ठळक मुद्देकपिलला पहिली गोड मुलगी आहे, जिचे नाव अनायरा आहे. यंदाच्या 10 डिसेंबरला अनायरा एक वर्षांची झाली आहे. 

मुंबई - कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या घरी दुसऱ्यांदा लहान पाहुण्याचं आगमन झालं आहे. कपिल आणि गिन्नी यांना आज सकाळीच पुत्ररत्न प्राप्त झाल्याची माहिती कपिलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली. बाळ आणि बाळाची आई दोघांचीही प्रकृती उत्तम असून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे कपिलने सर्वांचे आभार मानले आहेत. कपिलची पत्नी गिन्नी चतरथची काळजी घेण्यासाठी कपिल शर्माची आई मुंबईत पोहोचली होती. नवीन पाहुण्याच्या स्वागतासाठी शर्मा कुटुंबीय उत्साही आणि आनंदी होते. 

कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच लवकरच गुडन्यूज देणार असल्याचं सांगितलं होतं. तत्पूर्वी करवा चौथ निमित्तीने कपिलची चांगली मैत्रीण भारती इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती. त्यावेळेस गिन्नी बेबी बंपसोबत दिसली होती. एवढेच नाही तर दिवाळीच्या फोटोत गिन्नीचा बेबी बंप दिसला होता. कपिल शर्माचं हे दुसरं अपत्य असून कपिलला पहिली गोड मुलगी आहे, जिचे नाव अनायरा आहे. यंदाच्या 10 डिसेंबरला अनायरा एक वर्षांची झाली आहे. 

दरम्यान, कपिलच्या ट्विटनंतर कपिल आणि गिन्नीसह शर्मा कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून कपिलचं अभिनंदन करण्यात येत आहे.  लॉकडाऊन नंतर कपिल शर्मा खूप स्लिम आणि हँडसम दिसत आहे. माहितीनुसार त्याने लॉकडाऊन दरम्यान ११ किलो वजन कमी केला आहे. लॉकडाऊनपूर्वी कपिलचे वजन ९२ किलो होते त्यानंतर त्याने वजन कमी करून त्याचे वजन ८१ किलो झाले आहे. सध्या तो एका वेबसीरिज शूटिंग करत आहे.

Web Title: Hello ... Kapil Sharma gave good news to the fans, for the second time he became a 'father' man