तो घटस्फोटित आहे, दोन मुलांचा बाप आहे म्हणत अनेकांनी करिनाला दिला होता सैफसोबत लग्न न करण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 12:47 IST2020-06-12T12:46:17+5:302020-06-12T12:47:02+5:30

लोकांचे ऐकले असते तर कधीच झाले करिनाचे सैफसोबत लग्न, वाचा काय म्हणाली बेबो

He is a divorcee, has 2 kids : Kareena Kapoor says everyone warned her against marrying Saif Ali Khan | तो घटस्फोटित आहे, दोन मुलांचा बाप आहे म्हणत अनेकांनी करिनाला दिला होता सैफसोबत लग्न न करण्याचा सल्ला

तो घटस्फोटित आहे, दोन मुलांचा बाप आहे म्हणत अनेकांनी करिनाला दिला होता सैफसोबत लग्न न करण्याचा सल्ला

ठळक मुद्दे सैफसोबत लग्नाचा निर्णय घेणे करिनासाठी सोपे नव्हते.

सैफ अली खान व करिना कपूर हे बॉलिवूडचे लोकप्रिय कपल आहे. अनेक वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आताश: या लग्नाला बरीच वर्षे झालीत. दोघांना तैमूर अली खान नावाचा मुलगाही आहे. सैफसोबत लग्नाचा निर्णय घेणे करिनासाठी सोपे नव्हते. कारण अनेकांनी करिनाला सैफसोबत लग्न करण्याचा सल्ला दिला होता.

तो घटस्फोटित आहे. दोन मुलांचा बाप आहे. तुला त्याच्यापेक्षा अधिक चांगला मुलगा मिळेल, असे म्हणत अनेकांनी तिच्या सैफसोबतच्या लग्नाला विरोध केला होता. करिनाने स्वत: हा खुलासा केला होता.

तिने सांगितले होते की, मी सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. तू खरच त्याच्यासोबत लग्न करणार आहेस? असा प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यात होता. तो घटस्फोटित आहे, दोन मुलांचा बाप आहे. लग्नानंतर तुझे करिअर संपेल, असे काय काय लोकांनी मला म्हटले होते. मी मात्र ठाम होती. प्रेम करणे गुन्हा आहे का? लग्न करणे गुन्हा आहे का? असा प्रश्न मी विचारत होते. अखेर जे काही होईल ते बघेन, असा निर्धार करून मी सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

दोनदा दिला होता नकार
ऐकून आश्चर्य वाटेल पण दोनदा करीनाने सैफला लग्नाला नकार दिला. मात्र तिस-यांदा सैफने लग्नाची मागणी घातली तेव्हा ती नाही म्हणू शकली नाही.
 मुलाखतीत करीना कपूरने सांगितले होते की,   आपल्याला लग्न करायला हवे, असे सैफने मला दोनदा सुचवले होते. पहिल्यांदा त्याने ही गोष्ट ग्रीसमध्ये असताना सांगितली. त्यानंतर लद्दाखला असताना पुन्हा एकदा त्याने लग्नाबद्दल विचारले होते. त्यावेळी माझी भूमिका ‘मला माहिती नाही’ अशी होती. कारण मी त्याला पूर्णत: ओळखत नव्हती. त्यामुळे मला काही कळतच नव्हते. मी खूप संभ्रमात होते. यामुळे तेव्हा मी त्याला नकार दिला. हा नकार त्याला अजून चांगल्याप्रकारे ओळखण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी होता. मी या लग्नाला माझ्या आयुष्यातील चांगला निर्णय समजते.


 

Web Title: He is a divorcee, has 2 kids : Kareena Kapoor says everyone warned her against marrying Saif Ali Khan