विराट आणि अनुष्काचे प्रेमाची साक्ष देणारे हे फोटो तुम्ही पाहिले आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 17:02 IST2017-09-20T11:32:21+5:302017-09-20T17:02:21+5:30
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेमाचे संबंध आता कुणापासूनही लपून राहिलेले नाहीत. दोघांचंही एकमेकांवर ...
.jpg)
विराट आणि अनुष्काचे प्रेमाची साक्ष देणारे हे फोटो तुम्ही पाहिले आहेत का?
ट म इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेमाचे संबंध आता कुणापासूनही लपून राहिलेले नाहीत. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असल्याचे अनेकदा समोर आले आहे. एकमेकांसोबत बराच काळ घालवणे, पार्ट्यांना एकत्र उपस्थिती लावणे यामुळे विराट आणि अनुष्काच्या प्रेमाच्या नात्यावर शिक्कामोर्तबच झाल्याचं बोललं जात आहे.
![]()
विराट कोहली मॅच खेळत असताना प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहून चिअर करणारी अनुष्का प्रत्येकानं पाहिली आहे. इतकंच काय तर आपल्या जीवनातील या स्पेशल व्यक्तीला चिअर करण्यासाठी अनुष्का सातासमुद्रापार पोहचल्याचंही अनेक रसिकांनी पाहिले आहे.
![]()
तर विराटही आपल्या लेडी लव्हसाठी काहीच कमी करत नाही. अनुष्कासह पार्ट्यांमध्ये त्याची उपस्थिती सा-यांनी पाहिली आहे. नुकतंच भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या जीवनावरील सिनेमाच्या प्रिमीयरला ब-याच स्टार्स आणि क्रिकेटर्सनी हजेरी लावली. त्यावेळी विराट आणि अनुष्काही उपस्थित होते. यावेळीही विराट आपल्या लेडी लव्हची म्हणजेच अनुष्काची खास काळजी घेत असल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा विराट आणि अनुष्का यांच्या प्रेमाच्या नात्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
![]()
हे दोघंही पुन्हा एकदा एकत्र आले असून त्याला निमित्त ठरलं आहे ते एका जाहिरातीचं शूट. 2013 साली एका शॅम्पूच्या जाहिरातीमध्ये विराट आणि अनुष्का एकत्र आले होते. आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे ते एका कपड्याच्या ब्रॅंडच्या जाहिरातीसाठी. विराट हा एका कपड्याच्या ब्रँडचा ब्रँड अँम्बेसिडर आहे. त्याच्याच जाहिरातीसाठी हे दोघं पुन्हा एकत्र आले. या जाहिरातीच्या शूटच्यावेळी दोघांमधील प्रेमाच्या नात्याची प्रचिती पुन्हा एकदा सा-यांना पाहायला मिळाली. पारंपरिक भारतीय शेरवानी परिधान केलेला विराट आणि आकर्षक साडीतील अनुष्का यांचा अवतार सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोंमधील विराट आणि अनुष्काच्या लूकसोबतच त्यांच्यातील प्रेमळ संबंध यांत पाहायला मिळत आहेत.दोघंही परफेक्ट कपल असल्याचे या फोटोत दिसत आहे. फोटोंवरुन दोघांमधली केमिस्ट्री चांगलीच रंगल्याचं पाहायला मिळतेय. या जाहिरातीच्या शूटवेळी विराट-अनुष्काचे एकमेकांकडे पाहणे, एकत्र वावरणे, एकमेकांकडे पाहून स्मित हास्य आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांची तितकीच काळजी घेणे हे या फोटोत पाहायला मिळत आहे. हे फोटो पाहून विराट आणि अनुष्काने लग्न तर केले नाही ना अशा चर्चाही रंगल्या. मात्र दोघांचं लग्न झालं नसून हे जाहिरात शूट असल्याचे समोर आले आहे. फोटोवरुन ही जाहिरात सध्या चर्चेत आहे. त्यामुळे आता ही जाहिरात पाहण्यासाठी रसिक नक्कीच आतुर असतील.
Also Read:So Romantic !! अखेर विराट कोहलीने दिली अनुष्कावरच्या प्रेमाची कबुली!