'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीच्या मुलाला पाहिलंत का?, दिसतो खूप हॅण्डसम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 11:33 IST2023-11-21T11:32:39+5:302023-11-21T11:33:09+5:30

Mandakini : मंदाकिनीच्या मुलाचे नाव रब्बिल ठाकूर आहे. तो दिसायला खूप हॅण्डसम आहे.

Have you seen the son of 'Ram Teri Ganga Maili' fame Mandakini? He looks very handsome | 'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीच्या मुलाला पाहिलंत का?, दिसतो खूप हॅण्डसम

'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीच्या मुलाला पाहिलंत का?, दिसतो खूप हॅण्डसम

बॉलिवूड अभिनेत्री मंदाकिनी (Mandakini) ही राज कपूर यांचा शोध मानला जातो. १९८५ मध्ये आलेल्या 'राम तेरी गंगा मैली' या लोकप्रिय चित्रपटात ती राजीव कपूरसोबत दिसली होती. या चित्रपटातील तिची निरागसता आणि सौंदर्य पाहून लोक वेडे झाले. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले. मात्र, नंतर ती इंडस्ट्रीपासून दूर गेली. मंदाकिनीने २७ वर्षांनंतर अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. चाहत्यांना मंदाकिनीचे कुटुंब, पती आणि मुलांबद्दल जाणून घ्यायचे आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला तिचा मुलगा रबिल ठाकूर बद्दल सांगणार आहोत.

मंदाकिनीच्या मुलाचे नाव रब्बिल ठाकूर आहे. तो तिची आई मंदाकिनी सारखाच सुंदर दिसतो. मंदाकिनीने सांगितले होते की, तिने आपल्या मुलासाठी साजन अग्रवालच्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्यास होकार दिला होता. आईच्या भावनांवर आधारित या गाण्यात ती आपल्या मुलासोबत दिसली होती, ज्याचे शीर्षक 'माँ ओ माँ' आहे.


मंदाकिनीचा मुलगा रब्बिल खूप हॅण्डसम आहे. तो इतर स्टार किड्सइतका लोकप्रिय नाही.  मंदाकिनी राम तेरी गंगा मैली नंतर तिने 'डान्स डान्स', 'लडाई', 'कहां है कानून', 'नाग नागिन', 'प्यार के नाम कुर्बान', 'प्यार करने के देखो' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसली. मंदाकिनी शेवटची १९९६ मध्ये रिलीज झालेल्या 'जोरदार' चित्रपटात गोविंदा, आदित्य पांचोली आणि नीलम कोठारीसोबत दिसली होती.

Web Title: Have you seen the son of 'Ram Teri Ganga Maili' fame Mandakini? He looks very handsome