अनंत अंबनीची मेव्हणी पाहिलीत का? राधिकाची बहिण सौंदर्यांत बॉलिवूडमधील अभिनेत्रींना देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 05:08 PM2024-04-03T17:08:42+5:302024-04-03T17:09:35+5:30

अनंत अंबनीची मेव्हणी अर्थात राधिकाची मोठी बहिण अंजली मर्चंट चर्चेत आली आहे. 

Have you seen Anant Ambani's sister-in-law? Radhika's sister Soundaryanta competes with Bollywood actresses | अनंत अंबनीची मेव्हणी पाहिलीत का? राधिकाची बहिण सौंदर्यांत बॉलिवूडमधील अभिनेत्रींना देते टक्कर

अनंत अंबनीची मेव्हणी पाहिलीत का? राधिकाची बहिण सौंदर्यांत बॉलिवूडमधील अभिनेत्रींना देते टक्कर

सध्या सगळीकडे राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचीच चर्चा आहे. राधिका आणि अनंत एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. त्यांच्या शालेय जीवनात सुरू झालेली मैत्री नंतर प्रेमात बदलली. नुकत्याच झालेल्या अनंत आणि राधिका यांच्या प्री वेडिंग समारंभाने संपुर्ण जगाचे वेधून घेतले. यातच आता अनंत अंबनीची मेव्हणी अर्थात राधिकाची बहिण अंजली मर्चंट चर्चेत आली आहे. 

राधिकानंतर आता सोशल मीडियावर अंजली मर्चंटबद्दल चर्चा सुरू आहे. अंजलीचे फोटो व्हायरल होत असून ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नसल्याचं चाहते म्हणत आहे.  राधिकाप्रमाणे तिची बहीणही खूप सुंदर आहे. स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीतही ती अभिनेत्रींना टक्कर देते. अंबानी कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ती स्पॉट झाली आहे.

 अंजलीदेखील स्वतः एक उद्योजिका आहे.  अंजली मर्चंटचे 2020 साली लग्न झालं होतं. ती 'ड्रायफिक्स'ची सह-संस्थापक आहे आणि कौटुंबिक व्यवसायही सांभाळते. एक यशस्वी व्यावसायिक कुटुंबातील असूनही अंजली मर्चंटने आपल्या कठोर परिश्रमाने स्वतःचं नाव कमावलं आहे. अंजली मर्चंट तिची बहीण राधिकाच्या खूप जवळ आहे. दोघींचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  प्री वेडिंग समारंभात दोघांनीमधील खास बॉन्डिंग दिसून आलं होतं.  राधिका आणि अंजली या ही वीरेन आणि शैला मर्चंट यांच्या मुली आहेत.  राधिकाचे वडील अनेक व्यवसाय चालवतात आणि इन्कोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. 

Web Title: Have you seen Anant Ambani's sister-in-law? Radhika's sister Soundaryanta competes with Bollywood actresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.