​‘हम्मा हम्मा...’तील आदित्य-श्रद्धाची हॉट केमिस्ट्री तुम्ही पाहिलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 17:41 IST2016-12-15T17:40:38+5:302016-12-15T17:41:44+5:30

OK Jaanu The Humma song released :‘ओके जानू’ या चित्रपटातील ‘हम्मा हम्मा...’ या गाण्याची चाहत्यांना बरीच प्रतीक्षा होती. अखेर हे गाणे आज रिलीज झाले. ९० च्या दशकात ‘बॉम्बे’ चित्रपटातील हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते.

Have you seen Aditya-Shastra Hot chemistry in 'Hmmma Hmmma ...'? | ​‘हम्मा हम्मा...’तील आदित्य-श्रद्धाची हॉट केमिस्ट्री तुम्ही पाहिलीत का?

​‘हम्मा हम्मा...’तील आदित्य-श्रद्धाची हॉट केमिस्ट्री तुम्ही पाहिलीत का?

के जानू’ या चित्रपटातील ‘हम्मा हम्मा...’ या गाण्याची चाहत्यांना बरीच प्रतीक्षा होती. अखेर हे गाणे आज रिलीज झाले. ९० च्या दशकात ‘बॉम्बे’ चित्रपटातील हे गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते. आॅस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमान याला या गाण्याने एक नवी ओळख मिळवून दिली होती. ए. आर. रहमान हेच गाणे ‘ओके जानू’मध्ये घेऊन आला आहे. मात्र एका वेगळ्या रूपात. आदित्य राय कपूर आणि श्रद्धा कपूर यांची हॉट केमिस्ट्री आणि बेस्ट कोरिओग्राफीसाठी ‘ओके जानू’मधील हे गाणे पाहायलाच हवे. 

 ‘बॉम्बे’ मधील ओरिजनल ‘हम्मा हम्मा...’ हे गाणे अरविंद स्वामी, मनीषा कोईराला आणि सोनाली बेन्द्रे यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. आता आदित्य आणि श्रद्धा या गाण्याला एक नवी ओळख देणार आहे. जुबीन नौटियाल आणि साशा तिरूपती यांनी हे गाणे गायले असून तनिष्क बागची, रॅपर बादशाह आणि ए. आर. रहमान यांनी याला वेगवेगळ्या रूपात कम्पोज केले आहे. रॅपर बादशाह या गाण्याबद्दल प्रचंड उत्सूक आहे. हे गाणे जुन्या गाण्यापासून एकदम वेगळे आणि हटके आहे. या गाण्याचा मूड वेगळा आहे. तरिही या गाण्याची जुन्या गाण्यासोबत तुलना होणार, हे मला माहितीयं. अशी तुलना झालीच तर मला काहीही हरकत नाही. माझ्यापरिने मी शंभर टक्के बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात मी समाधानी आहे, असे त्याने म्हटले आहे.
आगळ्या-वेगळ्या रूपातील हे   ‘हम्मा हम्मा...’  गाणे तुम्ही ऐका तर...


  

Web Title: Have you seen Aditya-Shastra Hot chemistry in 'Hmmma Hmmma ...'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.