सेटवर राजेश खन्ना उशीरा आले की त्या माणसाला खावा लागायचा मार, प्रेम चोपडांनी सांगितला हैराण करणारा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 17:00 IST2023-08-10T16:50:18+5:302023-08-10T17:00:51+5:30

एका मुलाखतीत प्रेम चोपडा यांनी राजेश खन्ना यांच्यासंबंधी असा एक किस्सा सांगितला होता की जो ऐकून सगळेच अवाक झाले.

Hathi mere saathi producer beat 1person every day on sets to teach rajesh khanna lesson in punctuality | सेटवर राजेश खन्ना उशीरा आले की त्या माणसाला खावा लागायचा मार, प्रेम चोपडांनी सांगितला हैराण करणारा किस्सा

सेटवर राजेश खन्ना उशीरा आले की त्या माणसाला खावा लागायचा मार, प्रेम चोपडांनी सांगितला हैराण करणारा किस्सा

राजेश खन्ना यांनी एकेकाळी त्यांच्या अभिनयाद्वारे लोकांच्या हृदयावर राज्य केले होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. राजेश खन्ना यांना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार मानले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.अभिनेता राजेश खन्ना यांचा असाच एक किस्सा चांगलाच चर्चेत आला होता. हाथी मेरे साथीच्या सेटवरील हा किस्सा बॉलिवूडमध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे.

हाथी मेरे साथी या सिनेमाचं दिग्दर्शन प्रेम चोपडा करत होते.  प्रेम चोपडा यांनी बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं आहे. त्यांनी राजेश खन्नाबरोबर अनेक सिनेमात काम केलं. एका मुलाखतीत प्रेम चोपडा यांनी राजेश खन्ना यांच्यासंबंधी असा एक किस्सा सांगितला होता की जो ऐकून सगळेच अवाक झाले.

1 मे 1971मध्ये हाथी मेरा साथी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमात राजेश खन्ना, तनूजा, मदन पुरी, सुजीत कुमार सारखे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. सिनेमाचे निर्माते चिन्नपा वेळेचे पक्के होते. त्यांना योग्य वेळेत काम करणं आवडत होतं. पण राजेश खन्ना कधीच वेळेवर यायचे नाहीत.  त्यांच्या या सवयीमुळे निर्माते वैतागले होते. 

 राजेश खन्ना  सकाळच्या शूटसाठी दुपारी यायचे.  एकेदिवशी चिन्नपा यांनी राजेश खन्ना यांना धडा शिकवायचं ठरवलं. राजेश खन्ना 11-12 वाजता हाथी मेरे साथीच्या सेटवर पोहोचले की निर्माते चिन्नपा एका व्यक्तीला बोलवायचे आणि त्याला मारायचे. चिन्नपा यांचं हे वागणं पाहून राजेश खन्ना समजून गेले की हे सगळं त्यांच्यासाठी सुरू आहे.  त्यानंतर राजेश खन्ना वेळेत शूटिंगसाठी सेटवर येऊ लागले.

Web Title: Hathi mere saathi producer beat 1person every day on sets to teach rajesh khanna lesson in punctuality