Hate Story 4 Trailer : उर्वशी रौतेलाच्या बोल्ड अंदाजाची पाहा झलक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2018 22:13 IST2018-01-27T16:43:54+5:302018-01-27T22:13:54+5:30
‘हेट स्टोरी-४’चा ट्रेलर रिलीज झाला असून, त्यामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला अतिशय बोल्ड आणि हॉट अंदाजात बघावयास मिळत आहे.

Hate Story 4 Trailer : उर्वशी रौतेलाच्या बोल्ड अंदाजाची पाहा झलक!
‘ ेट स्टोरी’ सिरीजच्या चौथ्या भागात अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्या हॉट अदा बघावयास मिळणार आहेत. त्याची झलक नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बघावयास मिळत आहे. यू-ट्यूबवर रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता सनी देओल याच्यासोबत ‘सिंह साहेब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाºया उर्वशीने करिअरची सुरुवातीला मॉडलिंग केली. आगामी ‘हेट स्टोरी-४’ मध्ये ती खूपच बोल्ड अंदाजात बघावयास मिळणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. पोस्टर बघूनच चित्रपटातील हॉट दृश्यांचा अंदाज येत होता. विशाल पांड्या दिग्दर्शित हा चित्रपट ९ मार्च रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना लव्हड्रामा बघण्यास मिळणार आहे.
चित्रपटात उर्वशी रौतेला व्यतिरिक्त अभिनेता करण वाही याचीही प्रमुख भूमिका आहे. उर्वशी अखेरीस ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. या चित्रपटातही ती अतिशय बिंधास्त अंदाजात बघावयास मिळाली होती. त्यानंतर ‘काबिल’मध्ये ती एक आयटम सॉन्ग करताना दिसली. त्याचबरोबर उर्वशीने यो यो हनी सिंह याच्यासोबत ‘लव्ह डोज’ नावाच्या व्हिडीओमध्ये काम केले. तिचा हा व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय झाला.