बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री इन्स्टाग्रामवर करणार डेब्यू? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 19:54 IST2020-03-05T19:52:42+5:302020-03-05T19:54:58+5:30

या अभिनेत्रीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या सोशल मीडिया डेब्यूची तिचे चाहते वाट पाहात आहेत.

Has Kareena Kapoor Khan FINALLY Joined Instagram? PSC | बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री इन्स्टाग्रामवर करणार डेब्यू? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री इन्स्टाग्रामवर करणार डेब्यू? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

ठळक मुद्देकरिना कपूर लवकरच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे अकाऊंट सुरू करणार असल्याची चर्चा रंगली आहे. करिना कपूरच्या नावाने नुकतेच एक अकाऊंट इन्स्टाग्रामला पाहायला मिळाले आहे.

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर कुण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. तैमूर दिसला रे दिसला की, पापाराझींचे कॅमेरे त्याची छबी टिपण्यासाठी पुढे सरसावतात. तैमूरला दिल्या जाणाऱ्या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लोक टीकाही करतात. पण तैमूरच्या लोकप्रियतेत जराही कमी आलेली नाही. करिना आणि सैफच्या या लाडक्या मुलाचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे. त्याचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तैमुरच्या फॅन पेजमार्फत हे फोटो, व्हिडिओ पोस्ट केले जातात. त्यांच्या या फोटोंना सैफचे आणि करिनाचे चाहते भरभरून प्रतिसाद देखील देतात. 

करिना आणि सैफचा मुलगा तैमुर सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध असला तरी त्याचे आई-वडील दोघेही सोशल मीडियापासून दूर राहाणेच पसंत करतात. पण आता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री करिना कपूर लवकरच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचे अकाऊंट सुरू करणार असल्याची चर्चा रंगली आहे. करिना कपूरच्या नावाने नुकतेच एक अकाऊंट इन्स्टाग्रामला पाहायला मिळाले असून त्या अकाऊंटवर एकही पोस्ट सुरुवातीला नव्हती. पण आता एक काळ्या रंगाची मांजर धावत असतानाचा एक व्हिडिओ या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला असून मी लवकरच येतेय... असे त्यासोबत लिहिण्यात आलेले आहे. 

या पोस्टला केवळ काहीच तासांत ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून करिना तुझी आम्ही सोशल मीडियावर आतुरतेने वाट पाहात आहोत असे तिचे चाहते तिला कमेंटद्वारे सांगताना दिसत आहेत.

करिनाचा गुड न्यूज हा चित्रपट काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. तिचा अंग्रेजी मीडियम आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून ती लाल सिंग चढ्ढा या चित्रपटात देखील आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Web Title: Has Kareena Kapoor Khan FINALLY Joined Instagram? PSC