सपना चौधरीचा स्टेज डान्स, पडला नुसता पैशांचा पाऊस; अखेर बॉडीगार्ड्सनी चाहत्याला रोखलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 05:07 PM2021-02-20T17:07:46+5:302021-02-20T17:12:05+5:30

सपना चौधरीचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात ती स्टेजवर आपले प्रसिद्ध गाणे तेरी आंख्या का यो काजलवर डान्स करताना दिसत आहे. (Sapna choudhary gana)

Haryanvi dancer sapna choudhary was dancing on stage but was upset about this thing | सपना चौधरीचा स्टेज डान्स, पडला नुसता पैशांचा पाऊस; अखेर बॉडीगार्ड्सनी चाहत्याला रोखलं!

सपना चौधरीचा स्टेज डान्स, पडला नुसता पैशांचा पाऊस; अखेर बॉडीगार्ड्सनी चाहत्याला रोखलं!

googlenewsNext


सपना चौधरी (Sapna Choudhary)चे एखादे व्हिडिओ साँग रिलीज झाले, की त्यावर पाहणाऱ्यांचा महापूर येतो आणि तिचा कुठे स्टेज परफॉर्मन्स असेल, तर विचारायलाच नको. तिचा स्टेज परफॉर्मन्स पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीवरूनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. चाहत्यांच्या अशा प्रेमामुळे  स्टार्सना अत्यंत आंद होतो. मात्र, अनेक वेळा चाहत्यांचे प्रेमच स्टार्ससाठी त्रासदायकही ठरते. असाच काहीसा प्रसंग सपना चौधरीच्या एका स्टेज परफॉर्मन्सदरम्यानही बघायला मिळाला. (Haryanvi dancer sapna choudhary was dancing on stage but was upset about this thing)

PHOTOS: आई झाल्यावर सपना चौधरीने केलं स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट, लेटेस्ट फोटो व्हायरल

जेव्हा सपनावर पडला नोटांचा पाऊस -
सपना चौधरीचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात ती स्टेजवर आपले प्रसिद्ध गाणे तेरी आंख्या का यो काजलवर डान्स करताना दिसत आहे. तीचे हे गाणे प्रचंड गाजले आहे. विशेष म्हणजे जेव्हा-जेव्हा सपनाचा कार्यक्रम असतो, तेव्हा तेव्हा लोक तिच्याकडे या गाण्यावर डान्स करण्याची फरवाईश करतात. सपना या गाण्यावर डान्स करत असतानाच, तिचे चाहतेही स्टेज समोर डान्स करताना दिसत आहेत. याच दरम्यान एक चाहता येतो आणि तो सपनावर नोटांचा वर्षाव करतो. थोड्याच वेळात दुसरा चाहताही येतो आणि सपनावर नोटांचा पाऊस पाडतो. यानंतर पुन्हा काही वेळांनी आणखी एक चाहता स्टेजवर येतो आणि तोही सपनावर पैशांचा वर्षाव करतो. यामुळे सपना परेशान होते. ही परेशानी तिच्या चेहऱ्यावरही दिसून येत आहे.

सोशल मीडिया सेन्सेशन सपना चौधरीने पहिल्यांदाच शेअर केला मुलासोबतचा फोटो, फॅन्सकडून लाइक्सचा पाऊस....

अखेर बॉडीगार्ड्सनी चाहत्याला रोखले -
हा चाहता जेव्हा सपनाच्या अधिक जवळ येतो, तेव्हा सपनाच्या मागे उभे असलेले लोक त्याला बाजूला करतात. तसेच नोटा उडवू नको, असे सांगतात. या व्हिडिओवरून सपनाच्या चाहत्या वर्गाचा अंदाजही लावला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये तिच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक वयोगटातील चाहते उस्थित असल्याचेही दिसते.

Web Title: Haryanvi dancer sapna choudhary was dancing on stage but was upset about this thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.