​हर्षवर्धन कपूरने का सोडला श्रीराम राघवन यांचा सिनेमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 14:58 IST2016-12-02T14:58:54+5:302016-12-02T14:58:54+5:30

अनिल कपूरचा लाडका लेक हर्षवर्धन कपूर बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी धडपडतो आहे. शेवटी स्टार किड्स आहात, म्हणून ...

Harshavardhan Kapoor dropped Shriram Raghavan's cinema? | ​हर्षवर्धन कपूरने का सोडला श्रीराम राघवन यांचा सिनेमा?

​हर्षवर्धन कपूरने का सोडला श्रीराम राघवन यांचा सिनेमा?

िल कपूरचा लाडका लेक हर्षवर्धन कपूर बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी धडपडतो आहे. शेवटी स्टार किड्स आहात, म्हणून तुम्हाला मोठी डेब्यू फिल्म मिळेल. तुमचे लॉन्चिंग धूमधडाक्यात होईल. पण एकदा का चित्रपट रिलीज झाला की, प्रेक्षक मायबापचं तुमच्या नशिबाचा काय तो फैसला करणार. हर्षवर्धनबाबतीतही नेमके हेच झाले. ‘मिर्झिया’मधून हर्षवर्धनने बॉलिवूड डेब्यू केले. अगदी वाजत गाजत हा चित्रपट रिलीज झाला. पण दुर्दैवाने हर्षचा डेब्यू पूर्णपणे फ्लॉप राहिला. अर्थात यातून हर्ष एक गोष्ट शिकलायं. ती म्हणजे, भविष्यातील चित्रपटांबद्दल तो चांगलाच दक्ष झाला आहे. इतका की, वेळ आली तर तो हाती आलेला चित्रपट सोडायलाही मागेपुढे पाहत नाहीय.
होय,‘मिर्झिया’ रिलीज होण्यापूर्वी हर्षने विक्रमादित्य मोटवाने यांचा ‘भावेश जोशी’ आणि दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा एक थ्रीलर सिनेमा साईन केला होता. पण आता हर्ष श्रीराम राघवनच्या चित्रपटातून बाहेर पडल्याची खबर आहे. हर्ष सध्या ‘भावेश जोशी’चे शूटींग करतोय. ही एक सुपर हिरो फिल्म आहे. हर्षवर्धन यात काही चित्तथरारक स्टंट करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी तो खास फाइटिंग स्किल्स ट्रेनिंग घेतोय. ‘मिर्झिया’च्या रिलीजपूर्वी हर्षने ‘भावेश जोशी’चे शूटींग सुरु केले होते. ‘भावेश जोशी’ नंतर श्रीरात राघवन यांचा थ्रीलर सिनेमा हर्षचा तिसरा सिनेमा होता. मात्र आता तो या सिनेमात नसणार. यामागचे कारण विचाराल तर राघवन यांची एक अट.  ‘भावेश जोशी’मधून काही वेळ काढून हर्षने आपल्या चित्रपटाचे किमान १० दिवसांचे शूटींग शेड्यूल पूर्ण करावे, अशी राघवन यांची इच्छा होती. मात्र ‘मिर्झिया’ पूर्णपणे आपटल्यानंतर हर्ष कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाही. त्यामुळे त्याने त्याचे संपूर्ण लक्ष ‘भावेश जोशी’वर केंद्रीत केले आहे. त्यामुळे राघवन यांना वेळ देण्यास त्याने नकार दिला. 
हे प्रकरण अनिल कपूरपर्यंत पोहोचले. अनिल यांनीही यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न केले. पण शेवटी हर्ष आपल्या मतावर ठाम होता. त्याने राघवन यांचा चित्रपट सोडण्याचा निर्णय जाहिर करून टाकला. आता राघवन नव्या चेहºयाच्या शोधात असल्याचे कळते. 

Web Title: Harshavardhan Kapoor dropped Shriram Raghavan's cinema?