साशाचा झाला हरमन! पाहा, अभिनेता हरमन बावेजाच्या लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 05:10 PM2021-03-21T17:10:00+5:302021-03-21T17:10:02+5:30

कधीकाळी लाखों तरूणींच्या ‘दिलाची धडकन’ असलेला अभिनेता हरमन बावेजा आज साशा रामचंदानीसोबत विवाह बंधनात अडकला.

harman baweja wedding photos actor made a grand entry with friends photos | साशाचा झाला हरमन! पाहा, अभिनेता हरमन बावेजाच्या लग्नाचे फोटो

साशाचा झाला हरमन! पाहा, अभिनेता हरमन बावेजाच्या लग्नाचे फोटो

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘लव्ह स्टोरी 2050’ मधून बॉलिवूड डेब्यू करणारा हरमन त्याच्या अ‍ॅक्टिंगपेक्षा हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रीय झाला होता.

कधीकाळी लाखों तरूणींच्या ‘दिलाची धडकन’ असलेला अभिनेता हरमन बावेजा आज साशा रामचंदानी हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला. गुरुद्वारात हरमश व साशा यांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हरमनची पत्नी साशा ही न्यूट्रिशन हेल्थ कोच आहे.  

लग्नाच्या वरातीत हरमन धम्माल मस्ती करताना दिसला. लग्नात हरमनने पिंक कलरची शेरवानी घातली होती. शिवाय पंजाबी स्टाईलने डोक्यावर फेटा बांधला होता.

याआधी हरमनच्या  कॉकटेल पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले होते. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने पार्टीमधील अनेक फोटो आणि एक व्हिडिओ शेअर  केले होते.  

 ‘लव्ह स्टोरी 2050’ मधून बॉलिवूड डेब्यू करणारा हरमन त्याच्या अ‍ॅक्टिंगपेक्षा हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रीय झाला होता. त्याचा हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण  लुक्स आणि हॉट बॉडी यामुळे हरमनची त्यावेळी बरीच क्रेझ होती. अर्थात हळूहळू  ही क्रेझ ओसरली आणि हरमन बॉलिवूडमधून बाहेर फेकल्या गेला.

एकेकाळी हरमन व प्रियंका चोप्रा यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या  प्रचंड गाजल्या होत्या. दोघेही पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. ‘लव्ह स्टोरी 2050’च्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम फुलले होते. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले. यानंतर हरमन व बिपाशा यांच्या डेटींगच्या बातम्याही आल्यात.

2014  मध्ये आपण बिपाशासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे हरमनने म्हटले होते. मात्र त्यावर्षी डिसेंबरमध्ये बिपाशाने हरमनसोबत ब्रेकअप झाल्याचे जाहिर केले. विक्ट्री, व्हाट्स योर राशी, ढिश्कियाऊ असे चित्रपट हरमनच्या नावावर आहेत. पण हे सगळेच चित्रपट आपटलेत अन हरमनच्या करिअरला उतरती कळा लागली.


 

Web Title: harman baweja wedding photos actor made a grand entry with friends photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.