प्रियंका चोप्राच्या एक्स बॉयफ्रेंडने बॉलिवूडला ठोकला रामराम, आता करतोय हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 04:04 PM2020-03-30T16:04:25+5:302020-03-30T16:18:22+5:30

बॉलिवूडचे जगचं विचित्र आहे.

Harman baweja turns poker master invests in a team gda | प्रियंका चोप्राच्या एक्स बॉयफ्रेंडने बॉलिवूडला ठोकला रामराम, आता करतोय हे काम

प्रियंका चोप्राच्या एक्स बॉयफ्रेंडने बॉलिवूडला ठोकला रामराम, आता करतोय हे काम

googlenewsNext

बॉलिवूडचे जगचं विचित्र आहे. येथे कधी नातं जुळेल आणि कधी तुटेल, हे सांगता येत नाही. या वळणावर अनेकांच्या समोर त्यांचा भूतकाळ येऊन उभा राहतो आणि अनेक गोष्टी बिघडायला लागतात. काही जण भूतकाळ विसरून पुढे जातात. हरमनचे शिल्पाची बहिण शमिता शेट्टीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. अभिनेता हरमन बावेजाचे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीसोबत चांगलं नातं आहे. हरमन गेल्या अनेक वर्षांपासून लाईमलाईटपासून दूर आहे. आता हरमन अभिनेय सोडून बिझनेसमन झाला आहे.

राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार, हरमनने इंडियन पोकर लीगची टीम खरेदी केली आहे. शिल्पाचा पती राज कुंद्राची कंपनी विवान इंडस्ट्रीजने आयपीएलच्या धर्तीवर इंडियन पोकर लीगची सुरुवात केली होती. हरमन या टीमचा मुख्य चेहरा आणि मालक आहे. हरमन पोकर टूर्नामेंट अटेंड करत असतो. याशिवाय तो पूर्णपणे बिझनेसवर फोकस करतोय. २००९ मध्ये आलेल्या ‘लव्ह स्टोरी २०५०’ डेब्यू करणारा हरमन बावेजा त्याच्या अ‍ॅक्टिंगपेक्षा हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रिय झाला होता.

हरमन एकेकाळी प्रियंका चोप्रासोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत होता. ‘लव्ह स्टोरी २०५०’च्या सेटवरच प्रियंका व हरमनची मैत्री झाली होती. त्यावेळी हरमन इंडस्ट्रीत अगदी नवखा होता. पण प्रियंकासोबत मात्र त्याची मैत्री चांगलीच बहरली. पुढे दोघेही एकमेकांच्या प्रेमातही पडले. अर्थात ‘वॉट्स यॉर राशी’ या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दोघांचेही ब्रेकअप झाले. एका मुलाखतीत हरमनने या ब्रेकअपमागचे कारण सांगितले होते.

Web Title: Harman baweja turns poker master invests in a team gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.