आता ‘चुपके-चुपके’ नाही ‘खुल्लम खुल्ला’! विकी कौशल व हरलीन सेठी ‘सैराट’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 08:47 PM2018-09-11T20:47:02+5:302018-09-11T20:50:54+5:30

होय, टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रीय टीव्ही होस्ट हरलीन सेठी हिला विकी कौशल डेट करतोय.

harleen sethi was spotted enjoying a romantic lunch date with the boyfriend vicky kaushal | आता ‘चुपके-चुपके’ नाही ‘खुल्लम खुल्ला’! विकी कौशल व हरलीन सेठी ‘सैराट’!!

आता ‘चुपके-चुपके’ नाही ‘खुल्लम खुल्ला’! विकी कौशल व हरलीन सेठी ‘सैराट’!!

googlenewsNext

‘राजी’ आणि ‘संजू’ या चित्रपटातील दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा विकी कौशल आणि अभिनेत्री हरलीन सेठी यांच्यात प्रेमाची खिचडी शिजतेय, ही बातमी आम्ही फार पूर्वीच तुम्हाला दिली होती. होय, टीव्ही अभिनेत्री, एक यशस्वी मॉडेल आणि एक लोकप्रीय टीव्ही होस्ट हरलीन सेठी हिला विकी कौशल डेट करतोय. खरे तर ब-याच दिवसांपासून या दोघांमध्ये प्रेमाचा लपंडाव सुरू आहे. पण आजपर्यंत विकी वा हरलीनने कुणालाही याची कानोकान खबर होऊ दिली नाही. दिग्दर्शक आनंद तिवारीच्या माध्यमातून विकी व हरलीनची भेट झाली. मग मैत्री आणि मग प्रेम झाले. पुढे ते चोरून-लपून एकमेकांना भेटत राहिले. पण आता कदाचित हे नाते जगापुढे मान्य करण्याची वेळ आली आहे किंवा विकी व हरलीन दोघेही ‘खुल्लम खुल्ला’ प्रेम करू इच्छित आहेत. कारण आता विकी व कौशल दोघेही बिनधास्तपणे एकमेकांसोबत फिरू लागलेत. आजचं या दोघांना एका रेस्टॉरंटबाहेर पाहिले गेले. यावेळी दोघेही एकदम कूल दिसले. 

मीडियाला पाहून कुठलीही लपाछपी न करता हरलीन व विकी दोघेही हसत हसत रेस्टॉरंट बाहेर पडले. हरलीन थेट कारमध्ये गेली. पण विकीने मीडियाला मस्तपैकी पोझही दिली. यावेळी विकी पिंक स्वीटशर्ट व डेनिममध्ये दिसला तर हरलीन व्हाईट टॉप आणि डेनिमध्ये दिसली.
या शुक्रवारी विकाचा ‘मनमर्जियां’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील एका गाण्यावर परफॉर्म करतानाचा स्वत:चा एक व्हिडिओ हरलीनने पोस्ट केला होता.
एकंदर काय तर विकी व हरलीन दोघांचीही प्रेमकथा ऐन बहरात आहे. या प्रेमकथेचा शेवट गोड व्हावा, याच शुभेच्छा देऊ यात.

Web Title: harleen sethi was spotted enjoying a romantic lunch date with the boyfriend vicky kaushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.