हार्दिकनं गर्लफ्रेंड माहिकाला दिले २५ व्या वाढदिवशी २५ सरप्राईज, सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 16:21 IST2026-02-20T12:25:53+5:302026-02-20T16:21:42+5:30

Hardik Pandya Girlfriend Mahieka Sharma 25th Birthday Grand Celebration Video

Hardik Pandya Give 25 Surprises To Girlfriend Mahieka Sharma On Her 25th Birthday See Celebration Video | हार्दिकनं गर्लफ्रेंड माहिकाला दिले २५ व्या वाढदिवशी २५ सरप्राईज, सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

हार्दिकनं गर्लफ्रेंड माहिकाला दिले २५ व्या वाढदिवशी २५ सरप्राईज, सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. १९ फेब्रुवारी रोजी हार्दिकची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री माहिका शर्मा हिने तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला. हार्दिकने आपल्या लेडी लव्हचा हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. केवळ शुभेच्छाच नाही, तर त्याने माहिकाला चक्क २५ खास सरप्राईज दिले.

माहिकाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक आणि माहिका एकत्र केक कापताना दिसत आहेत. संपूर्ण सजावट सुंदर लाल आणि गुलाबी रंगाच्या थीममध्ये करण्यात आली होती. यावेळी माहिकाने केशरी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता, तर हार्दिक बेबी पिंक रंगाच्या शर्टमध्ये कूल अंदाजात दिसला.


२५ व्या वाढदिवसाचे २५ गिफ्ट्स!
माहिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हार्दिकचा फोटो शेअर करत त्याचे आभार मानले आहेत. तिने लिहिले की, "हा एक अद्भुत वाढदिवस होता. हार्दिकने दिलेल्या २५ सरप्राईजपैकी प्रत्येक गोष्टीचा मी खूप आनंद घेतला. तुझे मनापासून आभार". वाढदिवस खास करण्यासाठी हार्दिकचे प्रयत्न पाहून ती भारावून गेली.

हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस...

श्रीलंकेतील एका आलिशान रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमधला रोमँटिक आणि हॉट फोटो पोस्ट करत हार्दिकने लिहिले, "हॅप्पी बर्थडे प्रिन्सेस... २५ वर्षांपूर्वी या जगात आल्याबद्दल तुझे आभार. तू मला माहित असलेली सर्वात अद्भुत व्यक्ती आहेस. आय लव्ह यू". विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या व्हॅलेंटाईन डेला हार्दिकने माहिकाच्या नावाचे 'M' अक्षर असलेला टॅटू आपल्या मानेवर गोंदवून घेत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.


कोण आहे माहिका शर्मा?
माहिका शर्मा ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर तिच्या फॅशन आणि फिटनेस संदर्भातील कंटेंटसाठी ओळखली जाते. हार्दिक आणि माहिकाच्या या केमिस्ट्रीवर चाहते सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Web Title : हार्दिक पांड्या ने गर्लफ्रेंड माहिका को जन्मदिन पर 25 सरप्राइज दिए।

Web Summary : क्रिकेटर हार्दिक पांड्या ने गर्लफ्रेंड माहिका शर्मा का 25वां जन्मदिन 25 सरप्राइज के साथ मनाया। सेलिब्रेशन का वीडियो वायरल हुआ। माहिका ने जन्मदिन और उपहारों के लिए हार्दिक को धन्यवाद दिया। श्रीलंका से हार्दिक ने रोमांटिक फोटो और शुभकामनाएं पोस्ट की।

Web Title : Hardik Pandya surprises girlfriend Mahika with 25 gifts on birthday.

Web Summary : Cricketer Hardik Pandya celebrated girlfriend Mahika Sharma's 25th birthday with 25 surprises. A celebration video went viral. Mahika thanked Hardik for the wonderful birthday and gifts. He also posted a romantic photo with heartfelt wishes from Sri Lanka.