हार्दिकची Ex पत्नी नताशाने खरेदी केली तब्बल इतक्या कोटींची लँड रोव्हर, किंमत ऐकून झोप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:08 IST2025-11-21T17:06:18+5:302025-11-21T17:08:27+5:30
नताशाने महागडी कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत तब्बल काही कोटींच्या घरात आहे. नताशाचे या नव्या कारसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये नताशा स्वत: ही कार चालवताना दिसत आहे.

हार्दिकची Ex पत्नी नताशाने खरेदी केली तब्बल इतक्या कोटींची लँड रोव्हर, किंमत ऐकून झोप उडेल
अभिनेत्री आणि मॉडेल असलेली नताशा स्टँकोविच तिच्या हार्दिक पांड्यासोबतच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत होती. घटस्फोट झाल्यानंतर नताशा आता एकटीच राहत आहे. नुकतंच नताशाने महागडी कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत तब्बल काही कोटींच्या घरात आहे. नताशाचे या नव्या कारसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये नताशा स्वत: ही कार चालवताना दिसत आहे.
नताशाने लँड रोव्हर या सगळ्यात महागड्या असणाऱ्या ब्रँडेड कंपनीची केशरी रंगाची लक्झरियस कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल ३.०५ कोटी इतकी आहे. इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरुन नताशाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहे. या नव्या गाडीसोबत नताशाला मुंबईच्या रस्त्यांवर स्पॉट करण्यात आलं होतं. या फोटोंमध्ये नताशा स्वत: कार चालवत असल्याचं दिसत आहे. चाहत्यांना या फोटोंवर कमेंटही केल्या आहेत.
नताशाने क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत लॉकडाऊनमध्ये लग्न केलं होतं. लग्न करण्याआधी काही वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. २०२० साली नताशाने हार्दिकसोबत घरीच लग्न करत संसार थाटला. तेव्हा नताशा प्रेग्नंट होती. त्यांना अगस्त्य हा मुलगादेखील आहे. लग्नाच्या चार वर्षांनी २०२४ साली घटस्फोट घेत ते वेगळे झाले आहेत.