#HappyBirthdaySRK: ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची गर्दी, लाडक्या एसआरकेला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 10:10 IST2018-11-02T10:08:56+5:302018-11-02T10:10:32+5:30

किंगखान शाहरुख खानचा वाढदिवस आहे अन् ‘मन्नत’बाहेर गर्दी जमणार नाही, हे शक्यचं नाही. आज २ नोव्हेंबर शाहरुखचा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर प्रचंड गर्दी केली.

#HappyBirthdaySRK: shah rukh khan waved hand on his birthday eve to fans waitin outside mannat | #HappyBirthdaySRK: ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची गर्दी, लाडक्या एसआरकेला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

#HappyBirthdaySRK: ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची गर्दी, लाडक्या एसआरकेला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

किंगखान शाहरुख खानचा वाढदिवस आहे अन् ‘मन्नत’बाहेर गर्दी जमणार नाही, हे शक्यचं नाही. आज २ नोव्हेंबर शाहरुखचा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाहरूखच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी ‘मन्नत’ बाहेर प्रचंड गर्दी केली. काल रात्रीपासूनचं ‘मन्नत’ बाहेरच्या रस्त्यावर शेकडो लोक जमले.

चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी बॉलिवूडचा बादशाह बाल्कनीत आला आणि त्यांनी चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले. यावेळी शाहरूखने निळ्या रंगाची टी शर्ट आणि काळा ट्राऊजर घातला होता.


शाहरूख बाल्कनीत येताच आपल्या या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी आतूर असलेल्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. तो क्षण बघण्यासारखा होता. या क्षणाचा व्हिडिओ त्यामुळे तुम्ही बघायलाच हवा.




यंदाचा वाढदिवस शाहरुखसाठी खास आहे. कारण आज वाढदिवसालाचं त्याच्या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा अर्थात ‘झिरो’चा ट्रेलर रिलीज होतोय. ‘झिरो’च्या निर्मात्यांनी आधीच ट्रेलरच्या लॉन्चिंगसाठी एसआरकेच्या वाढदिवसाचे मुहूर्त निवडले होते. काही तासांतच ‘झिरो’चा ट्रेलर रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरुख एका बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारतोय. 

Web Title: #HappyBirthdaySRK: shah rukh khan waved hand on his birthday eve to fans waitin outside mannat