Happy Birthday Raveena: ‘बिनधास्त’ रवीना टंडनबद्दल जाणून घ्या काही गोष्टी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 11:18 IST2016-10-26T11:18:43+5:302016-10-26T11:18:43+5:30

‘शहर की लडकी’,‘मस्त मस्त गर्ल’ अशा नावांनी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रवीना टंडन हिचा आज (२६ आॅक्टोबर) हा वाढदिवस. रवीनाने आपल्या बॉलिवूडच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिलेत. तिच्या बिनधास्त अदांसाठी ती ओळखली गेली. तिच्याचबद्दल काही गोष्टी...

Happy Birthday Raveena: 'Bindhastha' Learn about Raveena Tandon, some things ...! | Happy Birthday Raveena: ‘बिनधास्त’ रवीना टंडनबद्दल जाणून घ्या काही गोष्टी...!

Happy Birthday Raveena: ‘बिनधास्त’ रवीना टंडनबद्दल जाणून घ्या काही गोष्टी...!

ong>‘शहर की लडकी’,‘मस्त मस्त गर्ल’ अशा नावांनी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रवीना टंडन हिचा आज (२६ आॅक्टोबर) हा वाढदिवस. रवीनाने आपल्या बॉलिवूडच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिलेत. तिच्या बिनधास्त अदांसाठी ती ओळखली गेली. तिच्याचबद्दल काही गोष्टी...

रवीनाच्या वडिलांचे नाव रवि टंडन तर आईचे नाव वीणा टंडन होते. याच दोघांची नावे मिळून रवीनाचे नाव रवीना असे ठेवण्यात आले. रवीनाचे वडील एक नामवंत चित्रपट निर्माते होते.

- रवीना कॉलेजमध्ये असताना एकेदिवशी तिची ओळख दिग्दर्शक शांतनु शोरी यांच्याशी झाली. शांतनु यांनी रवीनाला बॉलिवूडमध्ये येण्याचा सल्ला दिला आणि याचमुळे कॉलेज सोडून रवीनाने बॉलिवूडची वाट धरली.

-  सन १९९१ मध्ये प्रदर्शित ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे रवीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात सलमान खान तिचा हिरो होता. हा चित्रपट दणकून आपटला. पण यातील रवीनाच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. 



- १९९४ हे वर्ष रवीनाच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण वर्ष सिद्ध झाले. यावर्षात आलेले ‘मोहरा’,‘लाडला’,‘दिलवाले’,‘अंदाज अपना अपना’ हे तिचे सिनेमे सुपरहिट ठरले. ‘मोहरा’ हा तर सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ हे गाणे अपार लोकप्रीय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली.



- १९९५ मध्ये आलेल्या ‘रक्षक’मध्ये रवीनाने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली हेती. मात्र यात तिच्यावर चित्रीत ‘शहर की लडकी’ हे गाणे तुफान गाजले आणि रवीना ‘शहर की लडकी’ म्हणून प्रसिद्ध झाली.



-२००३ मध्ये रवीना निर्मिती क्षेत्रात उतरली. ‘स्टंप्ड’ या चित्रपटाची निर्मिती तिने केली. पण या चित्रपटाला म्हणावे तसे यश आले नाही. पण एका गोष्टीत मात्र तिला यश आले. ते म्हणजे, वितरक अनिल थडानीचे प्रेम तिला मिळाले. २००४ मध्ये रवीना अनिलसोबत लग्नबंधनात अडकली. यानंतर रवीनाने पुन्हा ‘पहचान’ चित्रपटाची निर्मिती केली. पण हा चित्रपटही अपयशी ठरला.

- २००३ मध्ये रवीना बाल चित्रपट सोसायटीची अध्यक्ष बनली. पण तिचे कामात लक्ष नाही, असा आरोप झाला आणि २००५ मध्ये रवीनाने हे पद स्वत:हून सोडले.

- २००६ मध्ये प्रदर्शित ‘सँडविच’ या चित्रपटाच्या अपयशानंतर रवीनाने चित्रपटसृष्टीस रामराम ठोकला. दोन दशकाच्या दीर्घ करिअरमध्ये रवीनाने सुमारे ७५ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले.



- बॉलिवूडमधील करिअरमध्ये रवीनान्चे नाव अक्षय कुमारसोबत जोडले गेले. दोघांच्या अफेअरच्या वावड्या उठल्या. पण हे ‘प्रेम’ यशस्वी झाले नाही.



 

Web Title: Happy Birthday Raveena: 'Bindhastha' Learn about Raveena Tandon, some things ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.