Happy Birthday Bobby :बॉबी देओलची लव्ह स्टोरी तुम्हाला ठाऊक आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 12:23 IST2017-01-27T06:53:59+5:302017-01-27T12:23:59+5:30
अभिनेता बॉबी देओल याचा आज(२७ जानेवारी) वाढदिवस. बॉबीच्या पर्सनल लाईफबद्दल आपण फार कमी जाणतो. बॉबीच्या पत्नीचे नाव सुद्धा आपल्यापैकी अनेकांना माहित नाही. पण खरे सांगायचे तर बॉबीची लव्ह स्टोरी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.

Happy Birthday Bobby :बॉबी देओलची लव्ह स्टोरी तुम्हाला ठाऊक आहे?
अ िनेता बॉबी देओल याचा आज(२७ जानेवारी) वाढदिवस. ‘बरसात’ चित्रपटामुळे लोकप्रीय झालेला बॉबी देओल दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून बेपत्ता आहे. अलीकडे बॉबी बेपत्ता असल्याची खबर येऊन गेली. काम नसल्यामुळे बॉबी डीजे झाल्याच्याही बातम्या आल्या. पण या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे बॉबीने म्हटले आहे.
अलीकडे एका मुलाखतीत या बातम्या प्रचंड मनस्ताप देणा-या असल्याचे बॉबी म्हणाला. मी धर्मेन्द्रचा मुलगा आहे. मला मोठे रोल हवेत, म्हणून मी आलेल्या आॅफर्स धुडकावतो. मी एका रईस बापाचा बिघडलेला मुलगा आहे. आळशी आहे, असे काही काही लोक बोलतात. पण असे काहीही नाही. मी कामासाठी तरसतो आहे. मला काम द्या, मी स्वत:ला सिद्ध करून दाखवेल. मला काम मागण्यात काहीही लाज वाटत नाही. मला काम का मिळत नाहीय? हा प्रश्न मीच स्वत:ला अनेकदा विचारतो. ९० च्या दशकात सगळे काही स्लो होते. तेव्हा ना सोशल मीडिया होता , ना इंटरनेट. पण अचानक सगळे दृश्य बदलले. कदाचित या बदलाशी मी जुळवून घेऊ शकलो नाही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीने मला आऊटडेटेड म्हणून बाहेर फेकले. पण या बदलाशी जुळवून घेण्यासाठी मी धडपडतो आहे. मला काम हवे आहे, असे बॉबी म्हणाला.
बॉबीच्या पर्सनल लाईफबद्दल आपण फार कमी जाणतो. कदाचित म्हणूनच त्याच्याबद्दल अधिक चर्चा होतात. बॉबीच्या पत्नीचे नाव सुद्धा आपल्यापैकी अनेकांना माहित नाही. पण खरे सांगायचे तर बॉबीची लव्ह स्टोरी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. बॉबीला पहिल्या नजरेत प्रेम झाले होते.
![]()
ALSO REAG : क्या से क्या हो गया!!!
‘बरसात’मधून बॉबीने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. हा चित्रपट चांगलाच लोकप्रीय झाला होता. याचदरम्यान बॉबी मुंबईच्या एका इटालियन रेस्टारंटमध्ये बसलेला होता. त्याचवेळी त्याच्यासमोरून एक सुंदर मुलगी गेली. त्या मुलीला पाहून बॉबी तिच्या प्रेमात पडला. ही मुलगी म्हणजे तान्या.यानंतर बॉबीने आपल्या सगळया मित्रांना कामी लावले. तान्याची माहिती गोळा करण्यासाठी सगळे आकाश-पाताळ एक केले.
तान्या ही एका फायनास कंपनीचे मॅनेजर देव आहुजा यांची मुलगी होती. यानंतर बॉबीने तान्याला फोन केला. नंतर गप्पा आणि नंतर प्रेम सुरु झाले. ज्या इटालियन हॉटेलात बॉबीने तान्याला पहिल्यांदा पाहिले होते, त्याच रेस्टारंटमध्ये बॉबीने तान्याला प्रपोज केले. तान्यानेही होकार दिला. यानंतर १९९६ मध्ये दोघांचेही लग्न झाले.
![]()
बॉबी चित्रपटांत रमला आणि तान्या घरांत. दोघांनाही आर्यमान आणि धरम अशी दोन मुले आहेत. बॉबीने आपल्या करिअरमध्ये अनेक चढऊतार बघितले. पण तान्याने प्रत्येक पाऊलावर त्याला सोबत केली आणि आजही करतेय. तान्या सध्या इंटिरिअर डिझाईनर क्षेत्रात काम करतेयं.