Happy Birthday Athiya Shetty : 28 वर्षांची झाली सुनील शेट्टीची लेक, या क्रिकेटरशी अफेअरची रंगलीय चर्चा !
By गीतांजली | Updated: November 5, 2020 13:38 IST2020-11-05T13:28:17+5:302020-11-05T13:38:14+5:30
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टीचा आज वाढदिवस आहे,

Happy Birthday Athiya Shetty : 28 वर्षांची झाली सुनील शेट्टीची लेक, या क्रिकेटरशी अफेअरची रंगलीय चर्चा !
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टीचा आज वाढदिवस आहे. अथिया आज 28 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म 5 नोव्हेंबर 1992 सली झाला. फिल्मी कुटुंबातून आल्यामुळे लहानपणापासूनच अथियाला घरी अभिनयाचे वातावरण मिळाले. अथियाने बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले आहे. न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमीमधून तिने फिल्म मेकिंग आणि लिबरल आर्टमध्ये पदवी प्राप्त केली.
अभिनयाव्यतिरिक्त अथिया शेट्टीला नृत्य करण्याची खूप आवड आहे. 2015मध्ये निखिल आडवाणीच्या 'हीरो' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला, हा सिनेमा 1983 साली आलेल्या सुभाष घई यांच्या 'हीरो' अधिकृत रिमेक होता.अथियाच्या अपोझिट यात सूरज पंचोली मुख्य भूमिकेत होता. यानंतर अथिया कॉमेडी सिनेमा 'मुबारकां'मध्ये दिसली होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. 'नवाबजादे' आणि 'मोतीचूर चकनाचूर' सिनेमे देखील तिचे फ्लॉप झाले.
चित्रपटांव्यतिरिक्त अथिया शेट्टी तिच्या पर्सनल लाईफला घेऊन देखील खूप चर्चेत असते. रिपोर्टनुसार अथिया शेट्टी क्रिकेटर केएल राहुलला डेट करते आहे. दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. या दोघांना अनेकवेळा सोबत पाहिलं गेलं. शिवाय ही दोघं एकमेकांच्या प्रत्येक फोटोवर लाईक्स-कमेंट्स करत असतात. अथिया व केएल यांपैकी कुणीही अधिकृतपणे या नात्याची कबुली दिलेली नाही.