Happy Anniversary : इंटरेस्टिंग आहे सोनम कपूर व आनंद अहुजाची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 17:35 IST2020-05-08T17:34:18+5:302020-05-08T17:35:02+5:30

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नाला आज (८ मे) दोन वर्षे पूर्ण झाले.

Happy Anniversary: Interesting is the love story of Sonam Kapoor and Anand Ahuja | Happy Anniversary : इंटरेस्टिंग आहे सोनम कपूर व आनंद अहुजाची लव्हस्टोरी

Happy Anniversary : इंटरेस्टिंग आहे सोनम कपूर व आनंद अहुजाची लव्हस्टोरी

बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्नाला आज (८ मे) दोन वर्षे पूर्ण झाले. यानिमित्ताने तिने तिचा नवरा आनंद आहुजाला स्पेशल अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. तिने त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

सोनमने हा फोटो शेअर करत लिहिले की, हा आमचा पहिला फोटो आहे. चार वर्षांपूर्वी मी अशा वीगेनला भेटले जो मुश्कीलने योगा करते आणि रिटेल व बिझनेसबद्दल बोलतो. मला तो खूप कूल व सेक्सी वाटला. आजही माझ्या हृद्याचे ठोके वाढवितो आणि सोबतच मला जमिनीवर ठेवतो. तुझ्यासारखा कुणीच नाही.


२०१४ मध्ये सोनम आणि आनंदची पहिली नजरानजर झाली होती. दोघांचीही कॉमन फ्रेण्ड परनिया कुरैशी हिला याचे श्रेय जाते. परनिया दोघांचीही चांगली मैत्रीण आहे. परनियाच्या माध्यमातून सोनम व आनंद पहिल्यांदा भेटले. या पहिल्या भेटीच्या महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले आणि इथून या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली. मे २०१८ मध्ये दोघांनीही लग्न केले.


आनंद व सोनमने एकमेकांना डेट करणे सुरु केले, त्या दिवसांपासून बरोबर दोन महिन्यांनी सोनमचा वाढदिवस होता. सोनमच्या वाढदिवसासाठी आनंदने एक सरप्राईज प्लान केले. त्याने एक रेस्टॉरंट बुक केले आणि सोनमच्या आवडीचा मेन्यू, म्युझिक अशी सगळी जंगी तयारी केली.


सोनम रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच आनंदने तिला त्याने हाताने लिहिलेले एक कार्ड गिफ्ट केले. सोनमसाठी हे सरप्राईज अविस्मरणीय ठरले.

कारण यापूर्वी कुणीही कधीही तिच्यासाठी असे काही केले नव्हते.

Web Title: Happy Anniversary: Interesting is the love story of Sonam Kapoor and Anand Ahuja