Half Girlfriend song : माधव व रियाच्या अमर्याद प्रेमाचे साक्षीदार बना... ऐका, ‘फिर भी तुमको चाहुंगा’...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 12:47 IST2017-04-18T07:17:54+5:302017-04-18T12:47:54+5:30
अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाचे आणखी एक गाणे आज रिलीज झाले. ‘फिर भी तुमको चाहुंगा’ असे बोल असलेले हे गाणे मिथुनने कम्पोज केले आहे.

Half Girlfriend song : माधव व रियाच्या अमर्याद प्रेमाचे साक्षीदार बना... ऐका, ‘फिर भी तुमको चाहुंगा’...
अ ्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटाचे आणखी एक गाणे आज रिलीज झाले. ‘फिर भी तुमको चाहुंगा’ असे बोल असलेले हे गाणे मिथुनने कम्पोज केले आहे. अरिजीत सिंह आणि शाशा तिरूपती यांच्या आवाजातील या गाण्याचे शब्द आहेत मनोज मुन्तसीर यांचे. अर्जुनने त्याच्या टिष्ट्वटर अकाऊंटवर हे गाणे शेअर केले आहे. ‘माधवच्या अमर्याद प्रेमाचे साक्षीदार बना... ’ असे अर्जुनने हे गाणे शेअर करताना लिहिले आहे.
गाण्याचे म्हणाल, तर मिथुनचे कम्पोझिशन आणि अरिजीतच्या आवाजाची जादू तुमच्यावरही चालणार, हे नक्की. मिथुन व अरिजीत या जोडीने पुन्हा एकदा शानदार काम केले आहे. या गाण्यात माधवचे अमर्याद प्रेम दिसते. दिल्ली युनिव्हर्सिटीपासून बनारस ते बिहार अशा अनेक वळणांनी जाणारे हे गाणे अखेरिस तुम्हाला विदेशातही घेऊन जाते. माधव व रियाच्या प्रेमात अखेर इतका ड्रामा का, हे तर तुम्हाला चित्रपटगृहांत जावूनच कळते. पण तोपर्यंत ‘फिर भी तुमको चाहुंगा’ हे गाणे ऐकायला हरकत नाही.
श्रद्धाने या चित्रपटात एका बिनधास्त मुलीची भूमिका साकारली आहे. मोहित सूरी दिग्दर्शित हा चित्रपट लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या नॉवेलवर आधारित आहे. या चित्रपटात एका बिहारी तरूणाची कथा दिसणार आहे. बिहारच्या एका गावातून दिल्लीला शिकायला आलेला माधव आणि दिल्लीत राहणारी रिया यांच्यातील रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित चित्रपटात श्रद्धा प्रथमच काम करते आहे. याऊलट अर्जुनची ही दुसरी वेळ आहे. याआधी चेतन भगतच्या एका नॉवेलवर आधारित '२ स्टेट्स'मध्ये अर्जुन दिसला होता.