यो यो हनी सिंगसोबत रॅप करणार बॉलिवूडचा 'हा' सुपरहिट हिरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 12:46 IST2018-04-26T07:16:16+5:302018-04-26T12:46:59+5:30

दोन वर्षानंतर हनी सिंग कमबॅक करायला तयार आहे. चित्रपट 'सोनू के टीटू की स्वीटी'मधील हनी सिंगने गायलेले 'दिल चोरी' ...

'Ha' super hit hero raped by Yo Yo Honey Singh | यो यो हनी सिंगसोबत रॅप करणार बॉलिवूडचा 'हा' सुपरहिट हिरो

यो यो हनी सिंगसोबत रॅप करणार बॉलिवूडचा 'हा' सुपरहिट हिरो

न वर्षानंतर हनी सिंग कमबॅक करायला तयार आहे. चित्रपट 'सोनू के टीटू की स्वीटी'मधील हनी सिंगने गायलेले 'दिल चोरी' सध्या सगळ्या पार्टींची ठिकाणी वाजते. आता तो 'बाजार' चित्रपटासाठी रॅप करणार आहे. यावेळी हे गाणं खूप स्पेशल असणार आहे कारण यात त्याच्यासोबत बॉलिवूडमधला एक सुपरस्टार रॅप करताना दिसणार आहे. 

'बाजार'मध्ये हनी सिंग आणि सैफ अली खान एकत्र येऊन गाणं रेकॉर्ड करणार आहेत. सैफ अली खान यासोबतच रॅपमध्ये डेब्यू करणार आहे. याआधी आपण सैफला अनेक वेळा लाईव्ह कॉन्सर्ट्समध्ये गिटार वाजवताना बघितले आहे. हनी सिंगसोबत सैफ पंजाबी गाण्यावर रॅप करणार आहे. या गाण्याला म्युझिक हनी सिंग देतो आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग पुढच्या महिन्यात मुंबईत होणार आहे. सैफच्या पहिल्या रॅप साँगवर चित्रांगदा सिंग आणि राधिका आपटे ठुमके लावताना दिसणार आहेत.  सैफला म्युझिकची चांगली जाण आहे. जवळपास 20 वर्षांपासून तो गिटार वाजवतो आहे. त्यांने फक्त देशातच नाही तर विदेशात देखील झालेल्या कॉन्सर्टमध्ये परफॉर्मे केले आहे. 

चित्रपट बाजारमधून विनोद मेहराचा मुलगा रोहन मेहरा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. स्टॉक मार्केटच्या धर्तीवर आधारित या चित्रपटात सैफ एक बिझनेसमनची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटात सैफचे नाव नवाब आहे. या चित्रपटात अतुल कुलकर्णी आणि अनुप्रिया गोएंकाची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाचे संगीत अमाल मलिक आणि तनिष्क बागचीने दिले आहे.  

ALSO READ :  ​सैफ अली खानसोबत बोर्डिंग स्कूलमध्ये घडले होते असे काही... संपूर्ण रात्र काढली होती रडून

गेल्या अनेक दिवसांपासून सैफ एक हिटच्या शोधात आहे. त्यामुळे बाजार चित्रपटातून त्याला अनेक अपेक्षा आहेत. 'कालाकांडी' हा त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. कालाकांडी’ हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रीलर होता. मात्र त्याला रसिकांची पसंती मिळाली नाही. 

Web Title: 'Ha' super hit hero raped by Yo Yo Honey Singh