बहिणीसोबत फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 07:00 AM2022-07-29T07:00:00+5:302022-07-29T07:00:06+5:30

आपण किती मोठे झालो तरी प्रत्येकालाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडते. बॉलिवूड सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत.

Guessb who childhood pic of bollywood actress Disha Patni is unrecognisable | बहिणीसोबत फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे ती

बहिणीसोबत फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे ती

googlenewsNext

Guess Who: बालपणीचा काळ सुखाचा असं कायमच म्हटलं जातं. आपण किती मोठे झालो तरी प्रत्येकालाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडते. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. तुफान लोकप्रियता मिळविली आहे. मात्र आजही ते त्यांच्या बालपणींच्या आठवणींमध्ये रमतात. तसेच सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे ही कलाकार मंडळी बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत असतात. असाच एका बॉलिवूड सेलिब्रेटीचा लहानपणीचा फोटो व्हायरल होतोय. 

फोटोत दिसणाऱ्या या क्युट मुलीला तुम्ही ओळखलंत का? आम्ही तुम्हाला हिंट देतो ही मुलगी आज बॉलीवूडमधील हॉट अभिनेत्री  आहे. ब्रेकअपच्या बातम्यांमुळे ती सध्या चर्चेत आहे. फोटोत बहिणीसोबत दिसणारी ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नाही तर दिशा पटानी (Disha Patni)आहे. 

दिशा पटानीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. दिशा तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफबद्दलही चर्चेत असते. नुकतंच तिचं टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झालं आहे. दिशा किंवा टायगर यांच्याकडून याबाबत कोणतचं ऑफिशल स्टेटमेंट अजून आलेलं नाही. 

दिशा पटानी(Disha Patni)च्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. आज तिचा'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात रिलीज होतोय. याशिवाय दिशा दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या 'प्रोजेक्ट के'मध्येही दिसणार आहे.

Web Title: Guessb who childhood pic of bollywood actress Disha Patni is unrecognisable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.