"माझं घर उद्ध्वस्त.."; देवीच्या मंदिरासमोर गोविंदाची पत्नी ढसाढसा रडली, काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 13:28 IST2025-08-15T13:26:56+5:302025-08-15T13:28:35+5:30
गोविंदाच्या पत्नीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात कुटुंबाचा विचार करुन ती रडताना दिसतेय. असं काय घडलं?

"माझं घर उद्ध्वस्त.."; देवीच्या मंदिरासमोर गोविंदाची पत्नी ढसाढसा रडली, काय म्हणाली?
बॉलीवूड अभिनेता गोविंदाचं कुटुंब कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. काही महिन्यांपूर्वी गोविंदाच्या पायाला गोळी लागली आणि मोठी चर्चा निर्माण झाली. इतकंच नव्हे गोविंदा त्याची पत्नी सुनीता अहुजासोबत घटस्फोट घेणार असंही बोललं जाऊ लागलं. अशातच सुनीताने तिच्या युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत सुनीता महाकाली माता मंदिरात दर्शनासाठी गेली असून, तिथे ती ढसाढसा रडताना दिसते. असं काय घडलं?
अन् सुनीताच्या अश्रूंचा बांध फुटला
व्हिडीओमध्ये दिसतं की सुनीता हात जोडून देवीसमोर उभी असते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. व्हिडिओमध्ये सुनीता भावुक होऊन सांगते की, “आयुष्य खूप कडू झालं आहे. मी माझं घर कोणालाही उद्ध्वस्त करू देणार नाही. मी माझ्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी देवीकडे प्रार्थना करते.” असं म्हणताना सुनीता रडताना दिसते. अनेकांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. “कुटुंबासाठी आई काहीही करू शकते” अशा शब्दात चाहत्यांनी सुनीताला धीर दिला आहे.
गोविंदा आणि सुनीता यांचं लग्न १९८७ मध्ये झालं होतं. त्यांना टीना आणि युवराज ही दोन मुलं आहेत. गोविंदा आणि सुनीता यांचं नातं अनेक गेल्या काही वर्षात अनेक कठीण प्रसंगातून गेलं असलं तरी ते नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. सुनीता यांनी कायमच त्या गोविंदापासून कधीही वेगळ्या होणार नाहीत, याचा खुलासा मीडियासमोर केला आहे. याशिवाय गोविंदाला जेव्हा गोळी लागली होती आणि तो हॉस्पिटलमध्ये दाखल होता, तेव्हा सुनीताने अत्यंत शांतपणे संपूर्ण प्रकरण हाताळलं.