"त्रास, भीती सगळं निघून गेलं आहे अन् आता...", गोविंदाने चाहत्यांसमोर व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:47 IST2025-12-30T13:47:22+5:302025-12-30T13:47:44+5:30
अभिनेता गोविंदा बऱ्याच काळापासून स्क्रीनवरुन गायब आहे. त्याच्या प्रोफेशनलपेक्षा वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा जास्त आहे.

"त्रास, भीती सगळं निघून गेलं आहे अन् आता...", गोविंदाने चाहत्यांसमोर व्यक्त केल्या भावना
अभिनेता गोविंदा बऱ्याच काळापासून स्क्रीनवरुन गायब आहे. त्याच्या प्रोफेशनलपेक्षा वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा जास्त आहे. गोविंदावर त्याच्याच पत्नीने अनेक आरोप केले. गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर सुरु असल्याचं सुनिता आहुजा म्हणाली. मात्र आता गोविंदा दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. सलमान खानच्या आगामी बहुप्रतिक्षित 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये गोविंदाचीही भूमिका आहे.
नुकत्याच एका इव्हेंटमध्ये गोविंदाने त्याच्या कमबॅकवर भाष्य केलं. तो म्हणाला, "जय श्रीराम! मी तुमच्यासमोर असं काही सांगणार आहे जे आधी कधीच सांगितलं नाही. जो त्रास होता, जी भीती होती ती आता निघून गेली आहे. आणि आता तुमचा हिरो, जो हीरो से निकलकर हिरो नंबर वन झाला आहे तो परत येत आहे. तुमचं माझ्यावरचं प्रेम असंच कायम राहूदे. मी गोविंदा तुमच्या सेवेसाठी हजर आहे. माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादने मला गोविंद ते गोविंदा बनवलं तो परत येत आहे. मी हनुमानजींकडेही प्रार्थना करतो."
#govinda The fear is gone from my heart now.
— Ravi Chaudhary (@BURN4DESIRE1) December 28, 2025
Govinda openly said Jai Shri Ram and Jai Bajrang Bali, and it feels powerful to hear this from a hero who once ruled Bollywood.
Govinda didn’t become Hero No.1 because of luckhe made himself one. At his peak, even the biggest stars… pic.twitter.com/rV8M54OkcL
असं म्हणत गोविंदाने हनुमानाचं भजन गायलं. त्याने चाहत्यांची भेट घेतली. हात मिळवला. काही दिवसांपासून गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्यात बिनसलं आहे. दोघंही वेगवेगळे राहतात आणि लवकरच घटस्फोट घेणार अशीही चर्चा झाली. सुनीता आहुजाने तर अनेकदा मुलाखतींमधून गोविंदावर आरोप केले. मात्र गोविंदा सुरुवातीपासूनच या प्रकरणी मौन बाळगून आहे.